तु नसताना

Submitted by संजयकुमार on 2 June, 2016 - 02:47

तु नसताना ..
मन लागत नाही कशात,
अस्तित्व तुझं शोधत राहतो
घरा मनाच्या कोपऱ्याकोपऱ्यात .

तु नसताना ..
रुसते झोप ,
आळसावते पहाट ,
रेंगाळतो दिवस ,
लांबते रात्र ,
पेंगती नेत्र ...ध्यास तुझा .

तु नसताना तरीही ,
सुटत नाही तोल ..
घसरत नाही पाय ..
वजा नसतेस तु..
भासतेस अधिकच..

कारण ,
तु नसताना तुच असतेस
अस्तित्व माझे ..

Group content visibility: 
Public - accessible to all site users