तो हजारातही महिनाभर घर चालवितो....

Submitted by किरण कुमार on 1 June, 2016 - 04:28

मी खर्चूनी लाखो मग हिशेबात दिस घालवितो
अन तो हजारातही महिनाभर घर चालवितो

वाट काढता या गर्दीतून माझी चिडचिड जाता
रस्ता सोबत घेवूनी तो सायकल रेटत गातो

चाखूनी मदिरा मी दुखः आटवितो रात्री
भूकेल्या चारुनी भाकर तो सुख वाटत बसतो

चिंतेने कुशी बदल,माझी गादीवर वळवळ
पाठ टेकूनी गच्चीला तो पानांची सळसळ होतो

मी पापांचा भरुन रांजण तहानलेला कायम
तो चाळणीतही भरुन कसा अलगद पाणी पितो

- किकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users