आजार

Submitted by जयदीप. on 27 May, 2016 - 12:18

तुलाही लागला बहुतेक हा आजार आहे
तुझ्या-माझ्यात शिल्लक राहिला व्यवहार आहे

कधी लागेल पिक्चर....जो बघत आहोत आपण
टिव्हीवर जाहिरातींचा किती भडिमार आहे

दिली होतीस का संधी जगाला सांग आता
तुला माहीत होते की असे होणार आहे !

बघितला बंद डोळ्यांनी तळपता सूर्य क्षणभर
प्रकाशातून आला केवढा अंधार आहे !

दिवस येतील आता चांगले, विश्वास आहे !
उद्या शनिवार आहे आणि मग रविवार आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिवास येतील आता चांगले, विश्वास आहे !
उद्या शनिवार आहे आणि मग रविवार आहे ............ उपहास सुरेख !

आवडली

दिली होतीस क संधी मध्ये ओळीशेवटी आता ऐवजी दुसरा एखादा अधिक चपखल शब्द योजता येइल का
दिवास << टायपो ?

असो

आवडलीच

सहज