Bow legs ( बेंड असलेले पाय ) किंवा X , O आकारात असलेल्या पायाचे दुखणे

Submitted by निशा राकेश गायकवाड on 25 May, 2016 - 02:59

download.jpg

काहींचे दोन्ही पाय असे असतात किंवा एकच पाय असा असतो ....
त्याच्या गुढघ्याच्या दुखण्यावर काही इलाज कुणाला माहित आहेत का ...अर्थो चे डॉक्टर थोड वजन कमी करा आणि त्यांनी KNEE बेल्ट दिला आहे सपोर्ट साठी काही गुडघ्याच्या मुमेण्ट्स पण सांगितल्या आहेत करायला पण बरेच दिवस झाले काही फरक पडत नाहीये . गरम पाण्याच्या पिशवीने शेकून झाल.
मोहरीच्या तेलाने पण मालिश केल.. योगा पण रोज केला जातो ...ह्यापलीकडे जाऊन काही उपाय असतील तर please शेयर करा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटत वजन कमी करुन आणि योगासनामधे सुर्यनमस्कार, हलासन, गोमुखासन, धनुर्रासन, शलभासन, नौकासन, उष्ट्रासन, ताडासन, त्रिकोनासन, पश्चिमोत्त्तासन उपयोगी पडतील. पोहणे ही एक क्रिया तुम्ही करु शकतात. कारण पोहताना पायांना छान व्यायाम मिळतो.

सुर्यनमस्कार, हलासन,पश्चिमोत्त्तासन>>>> ही आसन करते मी रोज पण फरक तेव्ढ्या पुरता जानवतो... चालताना होणारा त्रास काही थांबत नाहिये..:(

जिथे दुखत तिथे भरपुर वेळ कळ येईपर्यंत बर्फ ठेव. हे रोज रोज अनेक दिवस कर. पेन कमी होऊ शकेल. >>>>> ओके करुन बघते

पहिला (डावीकडून) जो फोटो आहे त्याला नॉक्ड नीज सिंड्रोम (knock knees syndrome) म्हणतात.

माझ्या ऑर्थो मित्राने सांगितले की खूप लहान वयात चालायला लागल्याने हे होऊ शकते. व्यायाम करत राहाणे आणि वजन कंट्रोलमध्ये ठेवणे याशिवाय फार काही उपाय नाहीये.

हे काहीसं overpronation आणि underpronation सारखं दिसतंय . त्या त्या प्रकारानुसार shoes घातले तर खूप फायदा होतो. मला थोडंसं overpronation आहे. पूर्वी जास्त चालणं सहन व्हायचं नाही. आता special shoes घालून बराच उपयोग होतोय Happy

वैद्यबुवा >>>> शिर्षकात बदल केला...:)

पियू मला फक्त डाव्या पायाला नॉक्ड नीज सिंड्रोम आहे... तरिहि खुप त्रास होतो.... व्यायाम, वजन कंट्रोलमध्ये ठेवणे.. सुरु आहे... पण आ ता ४-५ महिने होउन गेलेत.. काहि फरक नाही Sad

सुलक्षणा >>>> पूर्वी जास्त चालणं सहन व्हायचं नाही. आता special shoes घालून बराच उपयोग होतोय Happy >>>>>> मला देखिल चालणं सहन नाही.होत.... special shoes बद्दल काही सांगाल का अजुन...

मला डावीकडील कॉन्फिगरेशन चे पाय आहेत. गेल्या १ वर्षांपासून त्रास आहे. मी वरील व्यायाम करतो. एका दिवसा आड ४ ते ५ कि मी चालतो. दोनदा संधी सुधा तेल लावतो.
त्यातल्या त्यात बरे आहे / कधी वाढते , कधी शून्य होते. कॉज अँड इफेक्ट नाते प्रस्थापित होत नाही. डॉक्टर नी मला असेच मॅनेज होईल असे सांगितले आहे. मी वयाची ६३ वर्षे याच्या त्रासाविना काढली आहेत.

रेव्यु >>>>मी वयाची ६३ वर्षे याच्या त्रासाविना काढली आहेत.>>> Really this is very grateful... कारण हे paining फारच भयंकर आहे.. गुडघ्याला दगड बांधुन चालतोय अस वाटत Sad
संधी सुधा तेल>>> आयुर्वेदिक आहे का?

याला जीनू वेरम असे शास्त्रीय नाव आहे,मी असा सल्ला देईन की खूप चालणे शक्यतो टाळा नाहीतर arthritis होऊन गुडघा कायमचा बाद होईल,गाडीचा वापर करा,चालण्याऐवजी योगासने ,ईतर सुटेबल व्यायाम करा .नशिबाने एकाच पायाला आहे म्हणून बरे.तुम्हाला भावी आयुष्य्य वेदनारहीत जावो यासाठी शुभेच्छा.

सिंथेटिक जिनियस >>>> चालणं सहनच नाही होत....योगासने ,ईतर सुटेबल व्यायाम .. नक्की करेन मना पासुन धन्यवाद Happy

Hi preetiii , पाय आतल्या बाजूला वळणं म्हणजे overpronation आणि त्याच्या उलटं म्हणजे underpronation. दोन्ही problems मध्ये चालायला त्रास होतो याचं कारण आपल्या तळपायाची कमान योग्य आकार पकडत नाही त्यामुळे बाकी स्नायू आणि कण्यावर ताण येतो. Overpronation साठी मी जे shoes घेतले आहेत त्यांच्यामध्ये arch support साठी मुद्दाम एक उंचवटा आहे. त्यामुळे माझ्या problem चं correction होतं(ते shoes घातलेले असतानाच फक्त ) आणि त्रास न होता चालता येतं . तुमचा कोणत्या type चा प्रॉब्लेम आहे?

रेव्यू तुम्ही भाग्यवान आहात Happy
preetiii मला असे shoes UK मध्ये मिळले. Nike चे आहेत. आपल्याकडे पण बनवून मिळतात, माझ्या वडिलांनी बनवून घेतले होते एकदा.

सुलक्षणा... मी वर ज्या इमेज दिल्यात ना त्यात जो पायांचा x आकार दिसतोना तसा माझा डावा पाय आहे....मी सध्या डाॅक्टटर चप्पल वापतेय...but no use....पाय चालताना कमरे पासुन टाचेपर्ययत दुखतो...

पाण्यात चालण्याचा प्रयत्न करा. मला सांगितले होते पण जवळ स्विमिंग पूल नसल्याने व आळशीपणा मुळे केले नाही. किंवा स्टेशनरी सायक्कलिंग करा. पण गुडघ्यांची हालचाल अत्यावश्यक आहे. इतर व्याधी... उदा रक्त चाप, मधुमेह, हृदयरोग इ. साठी व्यायाम हवाच प्लस योगासने करून मॅनेज होईल. आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथ या दोघांना दा़खवा. दोन्हीची योग्य सांगड तुम्हला स्व्तःस घालता येईल.
मी वापरत असलेले संधी सुधा .... आयुर्वेदिक आहे पण काँट्रोव्हर्शियल आहे. काही जणांना मुळीच फायदा नाही म्हणून शिव्या घालतात. मला फायदा होत आहे... गेला महिनाभर वापरत आहे....... ते ऑन लाईन मिळते....... रु २३०० .... ३बाटल्यांचे.... फार फिल्मी जाहिरात होती.......... गोविंदा...जॅकी श्रोफ .... इ.
सातत्य ठेवले तर रिलीफ मिळेल असे माझे मत व अनुभव आहे.
ऑल द बेस्ट