एक भेगाळलेली जमीन

Submitted by देवनिनाद on 23 May, 2016 - 23:45

असंख्य भेगा ` मी ' म्हणणार्‍या ऊन्हाच्या आहेत
असं तेच तेच, नाही म्हणणार मी

या भेगा म्हणजे, पूर्वतयारी तूला कुशीत घेण्याची
चिरफाड करुन घेतलीय अंगा अंगाची, ती त्यासाठीच

ऊन मी म्हणतयं, म्हणतच राहील .. ..
ये, आता फार वाट पाहायला लावू नकोस

नाहीतर तू ही ` मी ' म्हणशील आणि पडशील धडाम्
मग तुझ्यात आणि त्या रखरखत्या ऊन्हात फरक तो काय

ये ना हळूवार, अलगद, आनंद देत ...
ऐकतोयस ना रे ....... पावसा ..

मी कोण ? ... एक ........................ जाऊ दे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users