पुढे आहेत सतराशे अटी

Submitted by जयदीप. on 19 May, 2016 - 08:22

पुढे आहेत सतराशे अटी
किती आहेत मागे कटकटी

शिजवता येत नाही डाळ मग
कशी येते बनवता आमटी

कडक आवाज आहे राहिला
जुनी आहे तशी ही फटफटी

कशी अाहेत झाडे येथली
क्षणापूर्वीच होती रोपटी

उगाचच वाट पाहत राहिला
निघाला एक रस्ता शेवटी

बरोबर शब्दही घेऊन ये
नको येऊस आता एकटी

तशी होती मला खात्री तुझी
सरळ होणार नाही शेपटी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बरोबर शब्दही घेऊन ये
नको येऊस आता एकटी

प्रथम वाचनात शेर खूप आवडला.

नंतर लक्षात आले कि उला मिसरा इतका स्पष्ट झालाय की सानी चे महत्व कमी होते आहे.

वा