मी उगाचंच डायरी,सांभाळली होती किती!

Submitted by सत्यजित... on 11 May, 2016 - 05:23

मोगऱ्याची कस्तुरी..गंधाळली होती किती!
नेमकी कुठली दिशा?धुंडाळली होती किती!

साऱ्या जगांस कळले,हे कधी कळलेच नाही...
मी उगाचंच डायरी,सांभाळली होती किती!

ही कश्याची तल्खली,दाटते आहे नव्याने?
विझत असता ज्योतही..तेजाळली होती किती!

जीव जावा एवढी,रुतली कशी त्याला व्यथा?
काळजाच्या पार ती!कवटाळली होती किती!!

सोड करणे वाह् वा,ते तुला जमणार नाही!
ती,'गझल-वाचून-ही'..स्वप्नाळली होती किती!

—सत्यजित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जीव जावा एवढी,रुतली कशी त्याला व्यथा?
काळजाच्या पार ती!कवटाळली होती किती >>खूप छान!

गजल आवडली