मिळून रस्ता पार करू चल !

Submitted by सुप्रिया जाधव. on 29 April, 2016 - 20:44

शब्दांचे हत्यार करू चल
छातीवरती वार करू चल

हो तर हो, नाही तर नाही
दोन्हीचा स्वीकार करू चल

हक्क बजावत आले वादळ
नावावर घरदार करू चल

हात धरू एकटेपणाचा
मिळून रस्ता पार करू चल

आठवणींची पहाट होइल
काळजात अंधार करू चल

घुसमट घुसमट नुसती घुसमट
सताड़ उघड़े दार करू चल

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users