मागुनी केला जरी तो वार होता ...

Submitted by बाळ पाटील on 25 April, 2016 - 03:17

मागुनी केला जरी तो वार होता
नेमका माझ्या घरी अंधार होता

आजही अंदाज चुकला त्या यमाचा
राख समजुन छेंडला अंगार होता

लावला त्यांनी गळ्याला फास ऐसा
भेटला मजला फुलांचा हार होता

तू जरी नव्हतीस माझ्या सोबतीला
आठवांचा रांगडा सरदार होता

मोडलो पण सोडली नाही इमानी
तेवढा रकतातला संस्कार होता

माझिया तत्वास माती चारणारा
अजुनही जन्मायचा अवतार होता
-- बाळ पाटील

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागुनी केला जरी तो वार होता
नेमका माझ्या घरी अंधार होता

>>> बापरे , भलताच अर्थ लागतोय कि हो ह्यातुन =))))