दु:ख होते

Submitted by इस्रो on 22 April, 2016 - 00:08

बोलले खोटे कुणी की खूप मजला दु:ख होते
पाहतो दु:खात जेव्हा मी कुणाला दु:ख होते

मानतो की मोह होतो फूल सुंदर तोडण्याचा
पण कळी खुडतात जेव्हा लोक काही दु:ख होते

श्वापदाचे वाटणे भय साह्जिक आहे परंतू
माणसाला वाटता भय माणसाचे दु:ख होते

खर्च पैसा होत असतो जास्त थोडा काय त्याचे!
मेळ नाही लागला की केवढे मग दु:ख होते

रानडे अन रामशास्त्री आजही आहेत येथे
पण हमीवर मुक्त होता भ्र्ष्ट नेता दु:ख होते

वार हल्ले दुश्मनांचे भय कधी ना दु:ख त्याचे
सोबती करतात अपुले वार जेव्हा दु:ख होते

-नाहिद नालबंद 'इस्रो'
[९९२१ १०४ ६३०]

Group content visibility: 
Public - accessible to all site users