साप आहे आपले नाते

Submitted by जयदीप. on 20 April, 2016 - 22:41

गझल :

घालतो धुडगूस आहे मी
पण बरा माणूस आहे मी

तू कव्हर आहेस, नसलेले
आतला कापूस आहे मी

साप आहे आपले नाते
एकटा मुंगूस आहे मी

बालपण झाले पुन्हा जागे
प्यायला पाऊस आहे मी

आतमध्ये पायरी आहे
मात्र वर हापूस आहे मी

बातमी आहे पसरलेली
की तुझा जासूस आहे मी

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users