मायाळूची भाजी

Submitted by दिनेश. on 8 April, 2016 - 07:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
माहितीचा स्रोत: 
सौ. नायक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजूताई.. सौ. नायक मंगलोरच्या होत्या. हे वाटण टीपीकल त्यांचे आहे. बंगाली पण करत असावेत, कारण हा वेल कुठेही वाढू शकतो.

मायाळू म्हणले की फास्टर फेणेची भागी गाय चुलाणात पडते ही गोष्ट आठवते.
भाजी अजून खाल्ली नाही कधी. दुसरे काही नाव नाही ना?

रेसिपी, फोटो मस्तच

ज्जे बात! आजचे दोन्ही पदार्थ एकदम आवडीचे. मायाळूची भाजी खाल्ल्याला खुप वर्ष झाली.

मस्त पाककृती आणि फोटो एकदम तोंपासु.

आजच ईन्डियन ग्रोसरीत ही फोइ(foie)या नावाने दिसली होती, नेमकी फारशी नव्हती अन जी होती ती पण मेन्गळटच वाटल्याने आणली नाही पण बहुधा मिळेल परत..तुम्ही लिहल्याने कळल तरी यालाच मायाळु म्हणतात ते.

वा, काय फोटो आलाय दिनेश! Happy

मायाळूच्या पानांच्या भजी खुपदा केलीये. मस्त कुरकुरीत होतात. पूर्वी कोकणातून दर पंधरा दिवसांनी रतीब यायचा. मायाळूचे वेल फक्त कोकणातच पाहिलेत, इकडे कुठेच नाही.
पानं फार बुळबुळीत असतात त्यामुळे पातळ भाजी कधीच ट्राय केली नाही.

सही दिसतेय भाजी. वाटतयं आता लगेच्च गरमागरम भात घेऊन त्यावर ही भाजी घालुन मस्त ओरपुन खावी.

ही भाजी असते खुपदा भाजीवाल्यांकडे पण नाव आणि करण्याची पद्धत माहित नसल्यामुळे घेतली नाही कधी. पुन्हा कधी दिसली तर घेईन नक्की.

आभार.

या भाजीला थोडा बुळबुळीतपणा असतो, त्यामूळे चिंच हवीच किंवा पिठ पेरायला हवे. नेहमीच्या पालेभाज्यांपेक्षा थोडी वेगळी चव असते. नक्की करुन पहा.

किश, हे स्थानिक नाव असू शकते. पानात पाण्याचा अंश बराच असतो आणि पाणथळ जागी ही वेल फोफावते.. दोन्ही कारणे आहेत.

हो हे दिसतं बाजारात पण आणायचं डेरिंग नाही होत. आम्हीपण आमच्या कारवारी शेजाऱ्यांकडे खाल्लीय. आंबट म्हणतात त्यांच्याकडे कुठल्याही करीला.

दिनेशदा , बेळगाव ला आजोली खूप खाल्ली होती ही भाजी. अन मग आई बाबांनी स्वतःच घर बांधल तेव्हा वाफे केले होते. वेलासारखे मांडव . पितळेच कल्हई केलेल , जाड बुडाच पसरट भांड होतं (लंगडी) त्यात केलेली चव अजून आठवतेय.
( अता लिहिता लिहिता , वाफे अन वेलात कन्फ्युजन होतय माझ. गोराडू नावाचे कंद अन मायाळू असे एकत्र होते. वेल कोणता आठवत नैये )

मस्त.
घरच्या बागेत होतं मायाळू. ऋषी पंचमीला ही भाजी ....म्हण्जे मायाळू आणि घरच्या अनेक भाज्या मिक्स करून त्यात आंबट ताक, थोडं दाण्याचं कूट असं घालून वरून तुपाची फोडणी.
अहाहा...आधीच गार्डन फ्रेश वेजीज आणि त्यात आईच्या हातची चव.
मला आठवतंय तसं याला अगदी बारीक जांभळ्ट फळंही येतात. ती हातावर चिरडली की हात रंगतो....अंधूक आठवण.

अन्जू.. आंबट बटाटा ही त्यांची फेमस करी !
इन्ना, दोन्हीचे वेल असतात. गराडूचे कंद खातात तर याची पाने. दोन्ही अगदी सहज वाढणारी !

मानुषी.. अगदी, शाई याच्यापासूनच बनवतात असा समज होता लहानपणी.. ते खरे नाही म्हणा. पण रंगपंचमी साठी अगदी सेफ रंग !

आमच्या कडे वेल होता याचा. पण फक्त भजीच होत असत. भाजी पण करतात हे माहित नव्ह्त.

मस्त रसिपी. आता मायाळु विकत आणुन करणार.

मुंबईत परेल (परळ) व लोअर परेल (लोअर परळ) तसेच लालबाग येथेहि ही भाजी मिळ्ते. मी साध्या पध्द्तीने करते पण आता वरील प्रमाणे करणार...सर्व साहित्य आहे अगदी आठळ्यंसहीत (फणसाच्या बिया) Happy

खुप मस्त रेसिपी..धन्यवाद दिनेश...

दिनेश दा

भाजी मस्त दिसतेय. अशी कधी केली नाही. करुन बघायला पाहिजे. आमच्या backyard मधे हिरवी
आणि जांभळी दोन्ही आहेत.

मंजूताई,

हो.बंगाली लोकांची ही खास आवडीची भाजी. बंगाली भाषेत ह्या भाजीचे नाव 'पुई' असे आहे, पालेभाजी म्ह्णून तिला पुईशाग म्हणतात.

बंगाली लोक ही भाजी veg आणि non-veg अशी दोन्ही प्रकारे करतात. पण ते भजी मात्र करत नाहीत.

veg करताना - मिक्स भाज्या ( बटाटे/ वांगी / लाल भोपळा इ). आणि पाच् फोड्ण ची फोड्णी.

non-veg करताना ब-याचदा छोटे prawns घालुन करतात.

काल ही रेसीपी वाचली आणि लगेच संध्याकाळी भाजी पटेल कडुन घेवून आले. रात्री भाजी केली. सुरेख झाली. मी लसणाची फोडणी घातली. आणि वरून शेवटी परत तेल गरम करून त्यात थोड तिखट घातल आणि ते तयार भाजी वर घातल.
तिरफळ, फणस, खोबर,धने वगैरे काहीही नाही. आमचं घरच तिखट(बिना कांदालसनाची चटणी) फक्त.
द्राक्ष बटाटा भाजी अजुनही नंबर १. पण मायाळूची भाजी नंबर २. Happy धन्यवाद.

फोटो छान दिसतोय आणि रेसिपीही इंटर्स्टींग वाटतेय.

आमच्या इन्डियन स्टोअर मध्ये मिळते की नाही माहित नाही. पण "बुळबुळीत" हे वर्णन वाचून अंबाडी, आंबट चुका ह्या भाज्या आठवल्या. आंबट चुका तर दिसायलाही असाच असतो ना? पण मी म्हणतेय त्या भाज्या जात्याच आंबट असतात.

तर महत्वाचा मुद्दा म्हणजे मायाळू नसेल मिळत तर पालक किंवा उग्र चव आणि रफ टेक्स्चर नसलेली कुठलीही पालेभाजी वापरून करता येईल ना ही भाजी?

मायाळू म्हणले की फास्टर फेणेची भागी गाय चुलाणात पडते ही गोष्ट आठवते.

+१०००००!!!!

मायाळु मस्त आहे भाजी, आम्ही भजी करीत असू ह्या भाजीच्या पानांची

लाल देठाची याचीच एक शोभेची बहिणही असते>> माहेरच्या माझ्या बागेत बरीच वर्ष होता हा वेल. मला कोणीतरी भज्याचा वेल म्हणून दिला होता.

मागच्याच आठवड्यात हि किंवा अशीच एक भाजी एका एशियन ग्रोसरी बसमध्ये पाहिल्याचे आठवते. पुढच्यावेळी परत दिसलीच तर नक्की घेणार.

मस्त आहे भाजी ! इकडे ह्या भाजीला वावडिंग म्हणतात. दोन्ही प्र्कार्चे वेल अंगणात येतात पण फार तर वर्षातून १ दा केली जाते.

ओह...मग याच मायाळूच्या बीया वाळल्या की त्याला वावडिंग म्हण्तात का? जे अर्भकांना पाजण्या,च्या पाण्यात घालून उकळतात?

मस्त प्रकार... आमच्या समोर एक उडीया कुटुंब हेते त्या करायच्या पातळ भाजी, याला जी फळे धरतात ती म्हणजे वावडींग का? अस त्यांनीच मला एकदा सांगीतले होते..

Pages