परिस्थिती पुढे हार नाही मानणार....

Submitted by भागवत on 7 April, 2016 - 23:35

संकटे येऊदे झुंडीने कितीही,
लढताना सत्व नाही मोडणार

संकटाचे अश्व कितीही उधळोत,
प्रयत्नाचे आसूड त्यावर ओढणार

वावटळीत घोघावूदे भाग्याची लक्तरे,
परिश्रमाचा झेंडा कष्टाने रोवणार

परिस्थिती झाली अति-क्रूर तरीही,
आत्मविश्वास गहाण नाही ठेवणार

अगणित झाले शत्रूचे आघात,
प्रतिकार करून मोडीत काढणार

संकल्पाचा मार्ग असेल काटेरी,
पराजयाचा खडक घामाने फोडणार

जीवनाचा प्रवास असतो खडतर,
अनुभवातून यशाचा मार्ग शोधणार

असूयेचे तिखट जहाल बाण,
त्यावर प्रेमाची फुंकर घालणारं

समाजा कडून न्यायाची अपेक्षा,
लेखणीतून बंड उभे करणार

वीज जरी पडली स्वप्नावरती,
संयमाच्या अस्त्राने मार्ग आखणार

होऊदे आकाशात संकटाची गर्जना,
सामना करूनच किर्ती मिळणार

Group content visibility: 
Public - accessible to all site users