दार्जीलिंग सहल - भाग ६ - जॉयराईड ऑन टॉय ट्रेन

Submitted by दिनेश. on 7 April, 2016 - 12:03

र्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन http://www.maayboli.com/node/57976

दार्जीलिंग सहल - भाग ३ - बोटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/58000

दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड, टायगर हिल http://www.maayboli.com/node/58009

दार्जीलिंग सहल - भाग ५ झू आणि एच. एम. आय. http://www.maayboli.com/node/58183

दार्जीलिंग मधे आमचा दुसरा आणि शेवटचा दिवस होता. तिथल्या टॉय ट्रेनबद्दल बरेच वाचले होते. १०० वर्षांपेक्षा जास्त काळ चालू असणारी हि छोटीशी रेल्वेगाडी आता जागतिक वारसा म्हणून घोषित झाली आहे. ती बांधली गेली
ब्रिटीश आमदनीत. मध्यंतरी भूकंपामूळे तिचे बरेच नुकसान झाले, तरी ती परत बांधून काढली आहे.

जलपायगुडी पासून वरच्या डोंगराळ भागात जाण्यासाठी ती बांधली गेली. अजूनही तिची तशी एक फेरी असते, आणि त्या प्रवासाला आठ तास लागतात. पण सध्या रस्ता झाल्याने आणि तेवढा वेळ नसल्याने, आम्ही तिची
दोन तासांची जॉय राईड घेतली. ही जॉय राईड दार्जीलिंग ते दार्जीलिंग अशी असते. दार्जिलिंग हून सुटून ती
बतासिया लूप ला दहा मिनिटे थांबते. या लूप वर एक वर्तूळाकार वळण घेऊन ती आधीच्या ट्रॅकवरच्या
बोगद्यावर जाते ( आणि अर्थातच हवी ती ऊंची गाठते ) तिथून ती घूम या स्टेशनला जाते. हे स्टेशन दार्जीलिंग
पेक्षाही ऊंचावर आहे. त्याच स्टेशनच्या आवारात रेल्वे म्यूझियम आहे. तिथे अर्धा तास थांबून ती ट्रेन परत
दार्जीलिंगला येते.

अशा दोन दोन तासांच्या चार फेर्‍या दिवसातून असतात. त्यापैकी काही डीझेल इंजिनाच्या तर काही मूळ वाफेच्या
इंजिनाच्या असतात. वाफेच्या इंजिनाच्या फेरीचे तिकिट जास्त आहे. ( कारण त्याच्या देखभालीचा खर्च जास्त आहे )
याचे तिकिट, खास करुन सिझनमधे आयत्यावेळी मिळणे कठीण आहे ( प्रत्येकी ३० आसनांचे केवळ दोनच डबे
असतात ) म्हणून ते आधी करावे लागते. ते भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवरुन करता येते. आणि मी देखील तसेच
केले होते ( त्याचाही जरा वेगळाच घोळ आहे. ते स्वतःच्या नावानेच करावे लागते. शिवाय ती वेबसाईट
सुरवातीचे आणि शेवटचे स्टेशन एकच असेल तर स्वीकारू शकत नाही. त्यासाठी त्याच स्टेशनचे दुसरे नाव
वापरावे लागते.. गम्म्मतच आहे ती. )

पण एकंदरीत माझा अनुभव काही तितकासा चांगला नव्हता. त्याला थोडाफार रेल्वेचा गलथान कारभार कारणीभूत
होता आणि थोडा तिथल्या हवामानाचा बेभरवसा.

त्यापूर्वी आम्ही तिथल्या जॅपनीज पीस पॅगोडाला भेट दिली होती. आणि सकाळी आमच्याच हॉटेलमधे भेटलेला
एक जर्मन डॉक्टरांचा ग्रूप तिथे भेटला. त्यापैकी एक भूलतज्ञ होती आणि हे कळल्यावर विवेकच्या तिथेच
म्हणजे न्याहारीच्या टेबलावरच गप्पा सुरु झाल्या. ( तो अगदी कुणाशीही गप्पा मारू शकतो. ज्यांना भूल द्यायची
त्या पेशंटशी सुद्धा ऑपरेशन होता होताच गप्पा मारतो. )

आम्ही जॉय राईड बूक केली होती संध्याकाळी ४ ते ६ अशी. आणि त्या आधीच्या फेरीत तोच ग्रुप होता.
त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, तूम्हीच बघा काय दिसते का ते !

दार्जीलिंग स्टेशनदेखील १०० वर्षांपुर्वीचे आहे. थोडीफार सुधारणा झाली असेल, पण मूळ आराखडा तोच आहे.
दिवसभर बाहेरच फिरत असल्याने, आम्हाला प्रसाधनगृह वापरायचे होते. तिकिट प्रथम वर्गाचे असल्याने ( सगळी
गाडीच प्रथम वर्गाची आहे ) त्या प्रतिक्षालयात गेलो तर तिथले प्रसाधनगृह फुटून वहात होते. अजिबात देखभाल
होत नव्हती. डब्यातही एक छोटेसे प्रसाधनगृह आहे, पण त्याचीही अवस्था तशीच भयाण होती. ( शेवटी एका
खाजगी हॉटेलमधे आसरा घ्यावा लागला )

डब्याची स्वच्छताही यथातथाच होती. प्रवास सुरु होताना एक अधिकारी येऊन निवेदन करुन जातो.
त्यादिवशीची संध्याकाळ धुक्याने लपेटलेली होती. बतासिया लुप वरून एरवी दिसला असता असा नजारा,
त्या धुक्यात गुडूप झाला होता. एरवी तिथे उत्तम राखलेली बाग असते, पण या दिवसात तिचीही देखभाल चालू
होती.

बतासिया लूपचा भाग सोडल्यास ही गाडी भर गावातूनच जाते, एवढेच नव्हे तर अगदी घरा, दुकानांना खेटून जाते.
घूम स्टेशनही अंधारेच आहे. म्यूझियम मधे काही दखल घेण्याजोग्या वस्तू आहेत पण ती जागा एवढी अंधारी आहे,
कि फोटो काढणे अशक्यच होते. त्या वस्तूंची मांडणीही काही फार आकर्षक नाही. ( त्याचे तिकिट रेल्वेच्या
तिकिटातच समाविष्ट आहे. )

नाही म्हणायला इंजिनाचे आणि इंजिनासोबतचे फोटो काढायची हौस भागवता येते.

दोन तासांच्या जॉयराईड मधे प्र्त्यक्ष प्रवास ८० मिनिटाचाच आहे. वाफेचे इंजिन मधे पाणी भरण्यासाठी पण थांबते.
तशी ती जॉयराईडही फारशी स्मूथ नाही.. ( जागतिक वारश्याबद्दल असे लिहिताना मलाही काही फारसे बरे वाटत
नाही, पण इतर देशांत अश्या वारश्यांची जशी काळजी घेतात, ते बघितल्यावर असे लिहिल्याशिवाय रहावलेही नाही )

त्या राईड नंतर आम्ही गावातच भटकलो. तिथे जेवण घेतले आणि वर हॉटेलवर पोहोचलो. फायरप्लेसच्या ऊबेत,
बर्‍याच रात्रीपर्यंत गप्पा मारत बसलो. दुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडलो, तर आणखी काही फुले दिसली.
आणि माझा पाय तिथून निघेना.

दुपारचे विमान गाठण्यासाठी लवकर निघणे भाग होते, येताना रस्ता अर्थातच तीव्र उताराचा आहे. तो लवकरच कटला. वाटेत चहा साठी थांबलो.

बागडोगराला वेळेवर पोहोचलो. तिथून जेट एअरवेजचे विमान होते. दिल्ली आणि तिथून मुंबईलाही वेळेवर
पोहोचलो.

तर हे काही फोटो.

१) दार्जीलिंगमधले चहाचे मळे. या सिझनमधे त्या झाडांची छाटणी झालेली असते. तिथेच चहा विकणारी
काही दुकाने आहेत. पण माझा असा अनुभव आहे कि तिथे जो चहा पाजतात तो आणि आपण विकत घेतो
त्या पाकिटातला चहा, वेगळ्या दर्ज्याचा असतो. त्यामूळे फार खरेदी करु नये. तिथे काही मसालेही ( वेलची,
लवंगा, तमालपत्रे, कलौंजी वगैरे ) विकायला होते. ते मात्र चांगले होते. पण ते बहुदा स्थानिक नसावेत.

२) चहाची पाने तोडली तर ५०० रुपये दंड आहे !!

३) तेनझिंग रॉक म्हणून एक कडा तिथे आहे. त्यावर दोराच्या सहाय्याने चढायची सोय आहे. मी पुर्वी केलेल्या
हायकिंगच्या तूलनेत तो अगदीच लुटूपुटूचा आहे. विवेकने आपली हौस भागवली. त्याच्यामागे जो दुसरा कडा
आहे, तिथेही तशी सोय आहे ( पण त्यादिवशी नव्हती ) तिथे दोन मदतनीसांच्या सहाय्याने प्रस्तरारोहण करता येते..

४) जॅपनीज पीस पॅगोडा जवळची टोपी पाडणार्‍या ऊंचीची झाडे

५) तो पॅगोडा

६) तिथल्या मूर्ती

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५) तिथलेच एक देऊळ

१६) आतली सजावट

१७) दार्जीलिंग मधले भू भू मात्र चांगलेच बाळसेदार होते..

१८) हे दार्जीलिंग स्टेशन

१९)

२०) तिथून समोर दिसणारी एक वास्तू

२१)

२२) धुक्यात हरवलेले बतासिया लूप

२३)

२४)

२५)

२६) घूम स्टेशन

२७) म्यूझियम

२८)

२९_)

३०) डेकेलिंग मधली न्याहारीची जागा

आणि तिथून दिसणारे दार्जीलिंग..

३१ ) डेकेलिंगच्या आवारातली काही फुले

३२)

३३)

३४)

३५)

३६)

३७)

३८)

३९)

४०)

४१) परतीची वाट

आणि वळणे..

४२) हे कुरसाँगला भेटलेले..

४३)

४४)

४५)

४६) दिल्ली विमानतळ

४७)

४८) उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दूज्या गावचा वारा..

समाप्त..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भाग पण प्रेक्षणीय झालाय . काही प्रकारची फुले फोटोत देखील; पहिल्यांदाच पाह्लला मिळालीत उदा. ४३ नम्बर
शेवट पण योग्य गाण्याने केलाय खुपच छान .....उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दूज्या गावचा वारा..

खूप छान आणी बघणीय झालीय ही मालिका. दिनेशजी तुम्ही फार म्हणजे फारच लकी आहात. जगभराचा देखणा प्रवास, अनूभवान्ची शिदोरी आणी रसरसलेला निसर्ग फार कमी लोकान्च्या वाटेला येतो.

मला वाटत आता भारतात तुम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, जम्मु-कश्मीर अशा सहली करुन त्याचे पण वर्णन लिहावे, म्हणजे अशी सन्धी तुम्हाला लवकरच यावो ही सदिच्छा.

आणी जगभरात नायगरा, ग्रॅन्ड कॅनियन, युरोपातले न पाहिलेली ठिकाणे याचे पण दर्शन घडो.

खूप सुंदर मालिका. सगळीकडे प्रतिसाद द्यायला जमलं नाही. पण सगळं वाचलं. अजून हा भाग पाहिलेला नसल्याने तर फारच छान वाट्लं . एस्पेश्यली फोटो. ...काही ठिकाणी बर्फी सिनेमाची आठवण झाली.

आभार..

रश्मी, अगदी याच शुभेच्छा हव्या आहेत मला... भारत बघायचा राहूनच गेला. आणि तोही पायी फिरत बघायचाय.