स्फुट ३ - पण ही बाई

Submitted by बेफ़िकीर on 7 April, 2016 - 10:24

काय ही धक्काबुक्की
कलकलाट
उतरत कोणीच नाही बसमधून
आत चढू पाहणारे मात्र वाढतायत

घरी वाट पाहत असेल ही
मी वेळेवर आल्याच्या आनंदात गुणगुणेल
बरी दिसायचा प्रयत्न करेल
मी तिच्यावर एक नजर ठेवून
टीव्ही बघत जेवताना
मुले कधी झोपतात ह्याची वाट पाहीन

वगैरे वगैरे

पण आज स्टॉपला उतरलोच नाही
एक स्टॉप पुढे गेलो
ठीक आहे
उलटे यायला शेअर रिक्षा करावी लागेल
दहा रुपये नेहमीपेक्षा जास्त जातील

पण......

ही चिकटून उभी असलेली उफाड्याची बाई
कधी नशिबात यायची?

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users