जे जे पटेल तेव्हा !

Submitted by vilasrao on 6 April, 2016 - 10:59

जे जे पटेल तेव्हा
--------------------

नाही कुणास जनता मग आवरेल तेव्हा
ते साव चोर होते सारे कळेल तेव्हा

खोडू जुना नव्याने इतिहास एकदाचा
काही नवीन सांगू जे जे पटेल तेव्हा

आता मलाच नाही जर भरवसा कुणाचा
सारे लिहून घेवू मग परवडेल तेव्हा

आहे अशी खुमारी जग चेतवायची जर
होईल काय सांगा ठिणगी पडेल तेव्हा

अंबर उदास होवो आम्हास काय त्याचे
इच्छेस पूर्ण करतो तारा तुटेल तेव्हा !

गेले पिळून असते ते हृदय सांग माझे
अत्तर असेल बाकी तर दरवळेल तेव्हा !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.

जीवन जलाराम पटेल असं आमच्या तरलशक्तीच्या प्राध्यापकांचं नाव होतं ते शीर्षकामुळे आठवलं. फर्गसन कॉलेज रस्त्यावर ललितमहालच्या थोडं पुढे गेलं की पूजा कॉपीअर्स हे दुकान आहे. त्याच्या मालकाचं नाव पण जे जे पटेल हेच आहे. ( पूर्ण नाव विचारून घेणे).

धन्यवाद!

"जे जे पटेल "हे पण पटण्यासारखेच आहे !!
"ते ते पटेल तेव्हा" असे केले असते तर तुम्हाला प्राध्यापक आठवले नसते !

हेही एक बरेच झाले!!

"ते ते पटेल तेव्हा" असे केले असते तर तुम्हाला प्राध्यापक आठवले नसते ! >>> कवितेत जर एखादे नाव आले असेल तर त्याबद्दल लिहीले जाणे सहज नाही का ? स्वतःवर ओढवून घेण्यासारखे किंवा चिडण्यासारखे काय आहे हे कळाले नाही.

अहो तुमचा काही तरी गैरसमज होतोय ,,,मी सहजच बोललो
चिडण्याचा प्रश्नच कोठे येतो ? कृपया गैर वाटून नका घेवू,,!