स्फुट १ - लिंगनिरपेक्ष देव

Submitted by बेफ़िकीर on 5 April, 2016 - 12:22

(मी मुक्तछंदात काव्य रचत नाही. खालील प्रकारच्या लेखनाला स्फुट असे नांव देणे मला पटते. एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रूपवर घेतलेल्या एका उपक्रमात मी अशी सहा स्फुटं लिहून सादर केली होती. त्यापैकी हे एक येथे देत आहे)

-'बेफिकीर'!
==========

लिंगनिरपेक्ष देवाची प्रतिष्ठापना केली
आणि हसत हसत मंदिराबाहेर आलो
तर पुरुष हत्यारे घेऊन उभे होते
हिजडे रांग लावून घुसाघुसी करत होते

आणि बायका......

हत्यार धरलेल्या पुरुषांच्या मर्दानी आवेशावर
जीव ओवाळत होत्या

मग मी पुन्हा आत जाऊन
एक रक्ताचा ठिपका घेऊन बाहेर आलो

मग बायका हतबुद्ध होऊन बघत बसल्या
हिजडे पुरुषांकडे हत्यारे मागू लागले

आणि पुरुष......

रांगेत घुसाघुसी करू लागले

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अर्थनिरपेक्ष काव्याची रचना केली
आणि हसत हसत बाहेर आलो
तर कवी चोपड्या घेऊन उभे होते
गझलकार रांग लावून घुसाघुसी करत होते

आणि वाचक ......

चोपड्या धरलेल्या कवींच्या तुफानी आवेशावर
स्मायल्या फेकत होते

मग मी पुन्हा आत जाऊन
एक अर्थाचा ठिपका घेऊन बाहेर आलो

मग वाचक हतबुद्ध होऊन बघत बसले
गगझलकार कवींकडे चोपड्या मागू लागले

आणि कवी ......

गझलेत घुसाघुसी करू लागले

कापोचे. ! Lol

खास तुमच्यासाठी..
शिरसाष्टांग दंडवत...!!!

लै खतरा लिहीलय राव !

जबरदस्त प्रतिभा आहे तुमच्याकडे..!!

कापोचे Proud

मूळ रचना आधी मला कळाली नव्हती.. पण कापोच यांच्या विडंबनानंतर मला अर्थ लागला ..
तो असा,

लिंगनिरपेक्षता.. रक्ताचा ठिपका .. नाना पाटेकर ..

ये औरत का खून ये मरद का खून .. बनाने वाले ने ईसमे कोई भेद नही किया, तो सालों तुम इन्सान कौन होते हो ये भेद करनेवाले..

बेफी, कविता कळली नाही(तशीही खूपच क्वचित कळते म्हणा).

---------------------------------------

तुमची माफी मागून,

चवनिरपेक्ष कांदा-भजीची तयारी केली
आणि हसत हसत किचनबाहेर आले
तर नवरा कळवळत हात जोडून उभा होता
मुलं रंग लावून लपायच्या तयारीत होते

आणि सासू......
कळवळत हात जोडून उभ्या असलेल्या मुलाकडे
संतापून आवेशाने पहात होत्या

मग मी पुन्हा किचनात जाऊन भजी तळून
एक भजीचा तुकडा घेवून बाहेर आले

मग सासू उपास आहे सांगून पोथी वाचायला लागल्या
मुलं भजी बघून हातोडी मागू लागले

आणि नवरा......

गपचूप किचनात जावून जेवणाची तयारी करू लागला

मी सुद्धा बेफिंची माफी मागत नवीन धागा न काढता इथेच विडिंबू इच्छितो.

.....

शतक निरपेक्ष धाग्याची निर्मिती सावंत केली
आणि हसत हसत गालातल्या गालात पेज रिफ्रेश मारले
तर टवाळ पॉपकॉर्न घेऊन उभे होते
अभ्यासू प्रतिसाद द्यायला धडपडत होते

आणि सर्वज्ञानी जाणकार ........

आम्ही धागा वाचलाच नाही म्हणत आलेल्या प्रतिसादांवर हसत होते.

मग मी पुन्हा संपादनात जाऊन
एक काडी टाकून बाहेर आलो

अभ्यासू कपाळाला हात लावत पसार झाले
सर्वज्ञानी जाणकार त्या काडीवर तुटून पडले

आणि टवाळ ...

मलाच पॉपकॉर्न भरवू लागले

-‘आर्रे ऋन्मेऽऽष’!

अभ्यासू कपाळाला हात लावत पसार झाले
सर्वज्ञानी जाणकार त्या काडीवर तुटून पडले

आणि टवाळ ...

मलाच पॉपकॉर्न भरवू लागले

----जब्राट