क्यु.ए.चा जॉब ( क्वालिटी अ‍ॅनॅलिस्ट)

Submitted by टीपापाकर on 25 March, 2016 - 11:03

मी सध्या अमेरिकेत Quality analyst च्या जॉबच्या शोधात आहे, माझ्याकडे भारतातल्या पदवी आणि मास्टर्स अशा दोन्ही डिगरी आहेत पण सुर्वातिला इच्छा असुन एच-४ मग मुल लहान, नवर्‍याची सतत फिरतिची आणी बरिच बिझी नोकरी त्यामुळे करिअर ला ब्रेक लागला ...आता चित्र बरच बदललय स्थिरावलय, व्हिसा वैगरे प्रोब्लेम पण नाही बॅक टु वर्क च्या प्रयत्नात आहे...
अगदी अ‍ॅन्ट्रि लेव्हल पासुन सुर्वात करावी लागणार आहे, माझ्या एका मैत्रिणी ने सुचवल्यावर मागचे ३-४ महिने guru99 वर foundaton level चा अभ्यास करुन परिक्षा दिलिय ..certificate ही आहे.
indeed .com वर शोध घेतिय तर सगळिकडे मिनिमम अनुभव विचारला जातोच...( माझ्याकडे इथे काम केल्याचा जुजबी कस्टमर सर्व्हिसचा अनुभव आहे)
इथल्या जाणकाराकडुन मार्ग्दर्शन मिळाल तर बर होइल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही घोळ झालाय का तुमचा?
तुमच्या प्रोफाईलमध्ये वेगळीच माहिती दिसत्येय.
तुमची प्रोफाईल तुम्ही टोकियोतले पुरूष असल्याचे दाखवत्येय.

image_89.jpg

ही काहीतरी कमालच झाली बै!

हे मिस्टरानी वाचनमात्र अस्ताना काढलेले अकाउन्ट आहे, मी नविन a/cकाढण्यापेक्षा हेच वापरु अस ठरवल.. सॉरी तस मेन्शन करायच लक्षात आल नाही, ( मायबोलिकर एवढे छानबिन करतात का?) असो , मुळ प्र्श्नाला उत्तर दिल तर बर होइल.

अमेरिका हा बराच मोठा देश आहे. तुम्ही नक्की कुठे राहता हे बघण्यासाठी तुमची प्रोफाईल बघितली जाऊ शकते कारण तुम्ही प्रश्नात ह्या महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला नाही.
तुम्हाला मनासारखी नोकरी मिळावी म्हणून शुभेच्छा!

नोकरीशी संबंधित प्रश्न विचारलात तर तुमचे प्रोफाईल बघितले जाणारच.
त्यात छान बिन काही नाही हो.

मायबोलीवरचे नुसते प्रोफाईल बघूनच नव्हे हो परागजी, अगदी माबोवर तुम्ही स्वयंसेवक म्हणून काय कार्यक्रमात भाग घेतलेत, काय काम केलेत यांमुळेही नोकर्‍या मिळू शकतात.(म्हणजे ते तुम्ही आपल्या अनुभवामध्ये जॉब प्रोफाईलमध्ये लिहू शकता.)
सो एकाची प्रोफाईल , आय डी शक्यतो दुसर्‍याने वापरू नये.
आता माबोवर तुम्ही कुठल्याही कार्यक्रमात भाग घेतला असेल तर एक अ‍ॅप्रेसिएशन मिळायचीही सोय झाली आहे.
तुम्ही अ‍ॅडमिननी काढलेला तो एक धागा वाचला असेलच.
असो, सूज्ञांस जास्त काय सांगावे?

पुन्हा तेच !! ह्या सगळ्या ज्ञानकणांचा आणि पहिल्या पोस्टचा खरच काही संबंध आहे का? इथे स्वयंसेवक म्हणून काम केलं, त्याला अ‍ॅप्रिशिएशन मिळालं, वगैरे कुठलीही केस अ‍ॅप्लिकेबल होते आहे का?

वर टीपापाकर म्हणाल्यात तसं मुळ प्रश्नाला उत्तर द्या की!

टीपापाकर, तुम्हांला ह्या फिल्डमधल्या जॉब्जबद्दल माहिती हवी असल्यास संपर्कातून इमेल करा. एक मैत्रिण काम करते ह्यात. तिच्याशी काँटॅक्ट करून देईन.

तुम्हाला अनुभव जुजबी आहे मग एकदम कुठे काम मिळणे कठीण आहे. तुम्ही ज्या लोकेशनला आहात तिथे QA/testing related काही रिफ्रेशर कोर्स असेल तर पहा. अशा institutes कोर्स केल्यावर प्लेसमेंट्ला मदत करतात.
त्याबरोबरच CSQA/CSTE/ISTQB या तर्‍हेचे Certification असेल तर आणखी मदत होते.
अधिक माहितीसाठी पहा.
www,softwarecertifications.org
www.istqb.in

शुभेच्छा!

क्यूए मधे आधीचा अनुभव नसेल तरी ट्रेनिंग, इंटर्नशिप वगैरे करून नोकरी मिळू शकते. जरा वेळखाऊ काम आहे पण मिळेल. काही ट्रेनिंग कोर्सेस असे आहेत की जे किमान एक इन्टर्नशिप देतात. बे एरिया मधे Portnov म्हणून एक संस्था आहे. बहुतांश रशियन लोक आहेत. तेथे कोर्स केला तर इंटर्नशिप देतात. मग ती कशी मिळते यावर पुढे किती जाता येइल ते ठरते. काही लोकांना इंटर्न्सशिप नंतर नोकर्‍या ही मिळतात तर काहींना स्वतंत्रपणे शोधाव्या लागतात.
हे अमेरिकेतल्या माहितीवरून लिहीत आहे.

तुम्ही असाल तेथे असे काही कोर्सेस आहेत का पाहा. त्यानंतर मग रिक्रूटर्स ना गाठून काही दिवस वाट पाहणे व इण्टरव्यूज देणे हे पेशण्टली करावे लागेल. पण माझा अंदाज आहे की काही दिवसांनी का होईना पण मिळेल. सहसा आधी कॉण्ट्रॅक्ट वाले जॉब्ज मिळतात. हे सगळे चालू असताना या क्षेत्रातील आणखी गोष्टी शिकल्या तर फायदा होतो.

एक अडचण म्हणजे या क्षेत्रात फेक अनुभव दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. तीन महिने ट्रेनिंग घेउन मग एक वर्षाचा अनुभव दाखवल्याची व त्यावरून कॉण्ट्रॅक्ट चे काम मिळवल्याची उदाहरणे ऐकली आहेत. त्या गर्दीत खरोखरचा प्रयत्न करणार्‍यांना वेळ लागतो.

>>
एक अडचण म्हणजे या क्षेत्रात फेक अनुभव दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. तीन महिने ट्रेनिंग घेउन मग एक वर्षाचा अनुभव दाखवल्याची व त्यावरून कॉण्ट्रॅक्ट चे काम मिळवल्याची उदाहरणे ऐकली आहेत. त्या गर्दीत खरोखरचा प्रयत्न करणार्‍यांना वेळ लागतो.>> सहमत. काल एका क्युए कोर्स केलेल्या मैत्रिणीने हेच सांगितलं.

>>या क्षेत्रात फेक अनुभव दाखवून काम मिळवणार्‍यांची संख्या प्रचंड आहे.

हे याच नाही बर्^याच क्षेत्रात आहे आय मिन जिथे कंप्युटर टेक्निकल किंवा फन्क्शनल स्कील्स लागतात. मार्केटमध्ये प्रॉडक्ट काल आलं तरी आम्ही चार इंप्लिमेंटेशन्सवर काम केलं आहे असे लोकं कुठच्या बेसिसवर लिहितात देव जाणे :रागः

नोकरीच्या सुरुवातीला या प्रकारांचा फार त्रास झाला आहे. आता कुंपणाच्या दुसर्^या बाजुला काही वेळा असताना अशा हिरो(आणि हिरवीण) लोकांना ओळखता येतं हीच काय ती जमेची बाजू. Happy

टीपापाकर, तुम्हाला शुभेच्छा!
वेका यांच्याशी अनेकवार सहमत.
माझ्या टीममधले जुने सहकारी तर अश्या लोकांबाबतीत म्हणतात - याचा/हीचा जन्म झाला कधी आणि इतका अनुभव घेतला कधी!!!! कुठे घेतला तेही ठोकून दिलेलेच असते. त्याची शहानिशा कशी होते ही एक आणखीन वेगळीच ष्टोरी आहे Happy