सायकलीशी जडले नाते २३ नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

Submitted by मार्गी on 24 March, 2016 - 02:14

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

१६ मार्च २०१५ ला सिंहगड सव्वा तासात केल्यानंतर उत्साह खूप वाढला. लदाख़ला सायकलवर जाणं शक्य आहे, हा विश्वास मिळाला. आता त्या दिशेने पुढची पावलं उचलायची आहेत. माझे सायकल गुरू नीरज जाट त्यासाठी मार्गदर्शन देत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, आता सायकलिंगच्या स्टॅमिना वाढवण्यासह सायकलचं रिपेअरिंगसुद्धा शिकायला हवं. पंक्चर, गेअर सेटिंग, ब्रेक सेटिंग हे यायला हवं. ती तयारीही तितकीच महत्त्वाची आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये सायकलिंग सुरू राहिलं. परभणीच्या जवळच्या रस्त्यांवर काही अर्धशतक झाले. परभणीतल्या एका सायकल मॅकेनिकच्या मदतीने रिपेअरिंग शिकायलाही सुरुवात केली. सायकलीचे दोन्ही टायर्स किती सहज वेगळे होऊ शकतात हे समजून घेतलं. दोन्ही टायर्स आणि सीट काढल्यानंतर सायकल अगदी वेगळी‌ दिसते! त्यामुळे ती बसवरून नेतानाही आता सोपं जाईल. आता सायकलचं मडगार्ड काढलं आहे. ट्रकवर असतात तसे लाल रंगाचे इंडिकेटर पेपर लावले आहेत. त्यामुळे रात्री अंधारातही सायकल दूरवरून दिसेल. अर्थात् अजून खूप रिपेअरिंग शिकायचं आहे.

वाढलेल्या स्टॅमिनामध्ये एक मोठी खेळी खेळायची आहे. मार्चचा उन्हाळा तर आहे, पण सायकल चालवण्यात अडचण येत नाहीय. शतक होऊन पाच- सहा महिने झाले आहेत, त्यामुळे आता परत एक मोठं शतक करायाचं आहे. परभणीपासून १६४ किलोमीटर अंतरावरच्या प्रसिद्ध लोणार सरोवराकडे जायचं ठरवलं. संध्याकाळी तिथेच थांबेन किंवा बसने परत येईन असा विचार करतोय. २७ मार्च २०१५! क्रिकेट वर्ल्डकपचा अंतिम सामना. पण भारत सेमी फायनलमध्ये हरल्यामुळे मॅचमध्ये रस उरला नाही. आज मला माझीच इनिंग खेळायची आहे! जर सर्व काही ठीक झालं तर माझी ही सर्वोच्च खेळी असेल.

सकाळी निघाल्यानंतर थोड्याच वेळात हवा कमी झालेली जाणवली. सोबत पंप व पंक्चर किट आहेच, हवा भरून घेतली. पण थोड्या वेळात परत कमी झाली. पंक्चर! माझ्याजवळ पूर्ण किट आहे, पण अजून पंक्चर काढणं शिकलो नाहीय. हवा भरून परत सायकल सुरू केली. लवकरच एक मॅकेनिकचं दुकान मिळालं. आधी तर मी सायकलचं पंक्चर करत नाही, असं म्हणाला. पण जेव्हा मी टायर सुटं केलं, पंक्चरचं किट काढलं, पाने घेऊन टायरमधून ट्युब बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला, तेव्हा तोही तयार झाला. माझ्याकडे सर्व व्यवस्था आहेच. त्यामुळे त्याला काहीच अडचण आली नाही. ह्यावेळी‌ पंक्चर कसं काढतात, हे जवळून बघितलं. पण ह्या सगळ्यामध्ये एक तास गेला. आता मला माझ्या योजनेनुसार पुढे जाता येईल?

पुढे कुठेच अडचण आली नाही. नंतर पंक्चरही झालं नाही. चांगल्या वेगाने जात राहिलो. ऊन कडक आहे, पण लिक्विड ओआरएस सोबत आहे. पाणीसुद्धा सारखं पितोय. दोन- तीन तास होऊन गेल्यानंतरही वेग चांगला राहिला. साडेपाच तासांनंतर जालना रोडवरच्या मंठा गावात पोहचलो. पंक्चरमध्ये गेलेला तास सोडला तर चाडेचार तासांमध्ये ७६.५ किलोमीटर झाले. इथून लोणार सरोवर ४५ किलोमीटर दूर आहे. पुढे जाऊ शकतो, पण संध्याकाळची बस मिळणार नाही. आणि एक तास आधीच लेट झालो आहे. घरूनही फोन आला आहे की संध्याकाळी बाहेर जायचं आहे. त्यामुळे लोणारकडे जाण्याऐवजी इथूनच परत फिरतो.


नकाशा. रस्ता पूर्ण सपाट होता.

परत जाताना सायकलीने पूर्ण साथ दिली. ओआरएस घेत राहिल्यामुळे क्रँप्स आले नाहीत आणि पायही दुखले नाहीत. छोटे टारगेटस घेऊन जात राहिलो. संध्याकाळ होताना घरी पोहचलो. माझं पहिलं दिड शतक! १५३ किलोमीटर झाले! आल्यानंतर थोड्या वेळाने कारसुद्धा ड्राईव्ह केली. नंतर परभणीतच परत चार किलोमीटर सायकल चालवली. आता पाय दुखत आहेत. पण १५७ किलोमीटर झाले! विश्वास बसत नाहीय. जर असाच स्टॅमिना वाढत राहिला तर २०० किलोमीटरसुद्धा करू शकेन!

 पुढील भाग २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा... मराठवाड्यातील उन्हामधे ऐन मार्च मधे म्हणजे कमाल आहे हो तुमची. Happy
फोटोंमुळ मजा येत्ये वाचायला....
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! Happy

स्ट्रेचिंग मी‌ सुरुवातीला फार करत नव्हतो; नंतर पूरक योगासने सुरू केली. पुढे तपशील येतीलच. पंक्चर काढायला शिकण्यासाठी ७-८ चुकीची पंक्चर काढावी लागली! तेही पुढच्या भागात येईलच. धन्यवाद! Happy

मस्त आहे ही पण राईड >>> +१. आपल्या ओ़ळखीची गावांची नावे अनेक वर्षांनी ऐकली की कस बरं वाटते. Happy