चंद्र बिलगून जातो !

Submitted by vilasrao on 18 March, 2016 - 08:54

गजल : 'बिलगून चंद्र जातो !'

उत्तर जरी बरोबर कधीच माझे नसते
चुकून 'बरोबर' कधी 'चुकल्यावर' असते !

अता खटकते मलाच टाळत तिचे वागणे
तिचे सहज असने तर विंचू उरात डसते !

अर्थ तिच्या "नाही"ला उरला नसेल काही
कोणास तासन तास आठवत अशी बसते !

बिलगून चंद्र जातो , भास उरे दर्यायी !
डहुळत हीच कहानी मनामनाशी असते !

खपली धरली आहे शिंपू नको सांत्वने
जखम चिघळते तेव्हा पुन्हा पुन्हा फसफसते !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users