मला आठवतात....

Submitted by आजित डिसोझा on 16 March, 2016 - 23:34

मला आठवतात ते दिवस आणि त्या रात्री
दिवस चैतन्न्याने सळसळलेले
रात्री आनंदाने बहरलेल्या

तुझं ते टपोऱ्या डोळ्यांनी खोलवर पाहणं
माझं त्या डोळ्यांत वाहून जाणं

तुझी चाहूल लागताच माझं मन नाचायचं
अनामिक ओढीने … संमोहित होऊन

तुझा स्पर्श हवाहवासा वाटणारा
मयुरपंखी … वाऱ्याच्या मंद झुळूकीसारखा

तुझ्या अस्तित्वाचा गंध आसमंतात दरवळून राहणारा
उल्हासित होती सर्व पाने , फुले, झाडे … वारा वाहणारा

स्वतःला हरवून जाणं काय असतं हे कळू लागलेलं मला तोंपर्यंत
पण … आता तुच हरवलेलीस

आताही आहेत ते दिवस अन त्या रात्री
दिवस निशब्द , निष्पर्ण वृक्ष्यासारखे
रात्री उदास , अस्वस्थ , अंधारलेल्या ……

…… अजित डिसोझा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!