देहाची माती होती

Submitted by vilasrao on 16 March, 2016 - 18:13

गजल : ' देहाची माती होती!'

आत्मेच वाहती शेती पीक भावनांचे झाले
देहाची माती होती हे मेल्यावरी कळाले !

नवी फुटेना पालवी अशी खोटी आस मनाची
हळूच वारे आले माझे पान न पान गळाले !

अवघे पुसती वेळ फुटाया कवटीला का माझ्या ?
सारे घाईत किती होते जे मयतीला आले !

गेलो 'चटका लावून मना !' हा आरोप तयांचा
जाळून कलेवर माझे जे, घेत निरोप निघाले !

दाम आपला खोटा झगडा परक्यांशी मी केला
जगणे असेच झाले गेले ते गंगेस मिळाले !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विलासरावजी,अभिनंदन!
पुन्हा एकदा लाजवाब खयाल!एकसे बढकर एक खरंतर!
भरपूर भरपूर आवडली गझल!

लय जरा अडखळली मध्ये!(मला नीट वाचता आली नसेल कदाचित!)
खूप खूप शुभेच्छा!

सत्यजित'जी आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक धन्यवाद,,,,!
आपण आधी सुचवल्याप्रमाने थोडा विचार करून गजलेतील खयाल स्पष्ट असायला हवे
या दृष्टिने मांडले याचे श्रेय तुम्हालाच आहे,,,,
मला मात्रावृत्तातिल लयीवर अजून पकड घेता आली नसेल ,,,!
पुन्हा प्रयत्न करतो ,
आपले प्रतिसाद माझेसाठी लाखमोलाचे आहेत !
पुनश्च धन्यवाद!