अजून काही बेसिक प्रश्न

Submitted by धक्का on 15 March, 2016 - 11:56

१.
आपण खाण्यासाठी शेंगदाणे, सुर्यफुल, सोयाबीनचे तेल वापरतो. मग खोबरेल तेल का वापरत नाही?
उपप्रश्न : डोक्याला लावायला खोबरेल तेलच का वापरतात? त्या Parachute च्या बाटलीवर Hair oil असा उल्लेख कोठेच नसतो.

२.
कच्चे पोहे कसे बनवतात?
शाबूदाणा, चुरमुरे वगैरे कसे बनवतात?

३.
जे लोक जन्मापासून आंधळे आहेत अशा लोकांचा जगाविषयी द्रष्टीकोन कसा असावा?
अशा लोकांना जेव्हा शस्त्रक्रियेनंतर द्रष्टी येते तेव्हा त्यांचा अनुभव काय असावा?

४.
संमोहन (hypnotism) विषयी आपले काय मत आहे. हे थोतांड की खरंच काही असतं?
संमोहीत व्यक्तीच्या पूर्वायुष्याची माहिती काढता येऊ शकते . यात कितपत तथ्य आहे.
संमोहनाविषयी काही रोचक किस्से आपल्याकडे आहेत काय?

५.
ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम यांच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे?
उपप्रश्न : ज्यू विरोधाचे नक्की काय कारण आहे? सोप्या भाषेत कोणी सांगेल काय?

६.
पिरॅमिडस् कोणी आणि कसे बांधले?
क्रॉप सर्कल विषयी तुम्ही ऐकून आहात काय? असे अजून रंजक प्रकार तुम्हाला माहिती आहेत काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ खोबरेल तेलही खाद्यतेल म्हणून वापरतात केरळात. कोकणात फणसाचे तळलेले गरे करतात ते खोबरेल तेलातच तळतात.
२ पोहे करण्यासाठी भात ( सालासकट तांदूळ) भिजत ठेवतात. मग ते पोह्याच्या गिरणीत देतात. तिथे ते गरम करून कुटतात. त्यामुळे टरफल निघते व तांदूळ सपाट होऊन पोहे तयार होतात.
बाकी no comments

१. केरळात आणि तामिळनाडुमध्ये काही भागात खोबरेल तेल खाण्यासाठी वापरतात. तिथे रेस्टॉरंट मध्ये गेले की खोबरेल तेल वासाचा घमघमाट येतो. सवय नसताना खाल्ल्यास घसा जरा खवखवतो, पण काही दिवसात सवय होते.

पिरामिड इजिप्शिअन लोकांचा पप्पांनी (पूर्वजांनी) बांधले आणि तिथे मम्मीला ठेवले Happy

जोक्स द अपार्टा, तुम्हाला एलिअन लोकांनी बांधले असावेत का यावर चर्चा अपेक्षित आहे का?

तुमच्याकडे गुगल नाही का हो?

एवढं मायबोलीचं कनेक्शन घेतलंत तर गुगलचं कनेक्शन पण घेऊन टाका.
Wink

'गुगल म्हणजे काय?' असा सातवा प्रश्न विचारू नका.

१ कारण ते Tax as cooking oil म्हणून भरतात Wink (tax चोरी या पळवाट म्हणू शकतात)
त्यांच्या जाहीरातीत मात्र तेल केसांना लावलेले दाखवले जाते खरतर ते पापड वगैरे तळताना दाखवायला हवे

१.
आपण खाण्यासाठी शेंगदाणे, सुर्यफुल, सोयाबीनचे तेल वापरतो. मग खोबरेल तेल का वापरत नाही?
उपप्रश्न : डोक्याला लावायला खोबरेल तेलच का वापरतात? त्या Parachute च्या बाटलीवर Hair oil असा उल्लेख कोठेच नसतो.
<<
तुम्हाला कुणी बंदी घातली आहे का?

२.
कच्चे पोहे कसे बनवतात?
शाबूदाणा, चुरमुरे वगैरे कसे बनवतात?
<<
www.youtube.com
www.google.co.in

यांपैकी कोणत्याही साईटीवर हा प्रश्न विचारून पहा.

३.
जे लोक जन्मापासून आंधळे आहेत अशा लोकांचा जगाविषयी द्रष्टीकोन कसा असावा?
अशा लोकांना जेव्हा शस्त्रक्रियेनंतर द्रष्टी येते तेव्हा त्यांचा अनुभव काय असावा?
<<

अशा लोकांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टी फक्त हिंदी/इंग्रजी सिनेमातून येते. "धीरे धीरे आँखें खोल"ता येत नाहीत. एकतर उघडतात नैतर उघडत नाहीत.

४.
संमोहन (hypnotism) विषयी आपले काय मत आहे. हे थोतांड की खरंच काही असतं?
संमोहीत व्यक्तीच्या पूर्वायुष्याची माहिती काढता येऊ शकते . यात कितपत तथ्य आहे.
संमोहनाविषयी काही रोचक किस्से आपल्याकडे आहेत काय?

<<

मनाचे खेळ. मोदी सरकार सत्तेत येणे हा या संमोहनप्रक्रियेचा, उर्फ मास हिप्नॉटिझमचा आजवरचा सर्वाधिक नेत्रदीपक प्रयोग होता, हे इथे रच्याकने नमूद करतो.

या नंतरच्या फेजमधे, अजूनही "मला मूर्खात काढून मोदी सत्तेत आले" हे मान्य न करता स्वतःलाच "मी इथल्या खासदाराला मत दिले कारण तो माझा मित्र/जातीचा/सभ्य वाटणारा/मोदीचांगलेकामकरतीलअसेवाटलेम्हणून" इत्यादी सांगून सेल्फ हिप्नॉटिझम करणार्‍यांचीही संख्या लक्षणीय आहे.

५.
ख्रिश्चन, ज्यू आणि मुस्लिम यांच्यामध्ये नक्की काय कनेक्शन आहे?
उपप्रश्न : ज्यू विरोधाचे नक्की काय कारण आहे? सोप्या भाषेत कोणी सांगेल काय?

<<

संपूर्ण धाग्याचे पोटेन्शिअल आहे.
ज्यूमधून ख्रिश्चन अन त्यातून मुस्लीम धर्म आला, इतिहास वाचा.

६.
पिरॅमिडस् कोणी आणि कसे बांधले?
क्रॉप सर्कल विषयी तुम्ही ऐकून आहात काय? असे अजून रंजक प्रकार तुम्हाला माहिती आहेत काय?

<<

भरपूर आहेत. अब्ब्यास करा.

****
शेवटी,

देवाने तुम्हाला "दुसरं काही" दिलेलं नसलं, तरी गूगल दिलंय् ना? Wink

२.
कच्चे पोहे कसे बनवतात?
शाबूदाणा, चुरमुरे वगैरे कसे बनवतात?

एका पातेल्यात कच्चे पोहे घ्या. त्यात जरासं तेल, तिखट, मीठ आणी शेंगादाने टाका. कांदा चिरुन टाका अन कालवा. झाले कच्चे पोहे.

शाबुदाना मात्र कच्चा बनवता येत नाही. रात्री भिजवाया लागतो. मग सकाळी शिजवून उसळ करा.
चुरमुरे पोह्या सारखेच बनवा.