एक मैफिल

Submitted by अभिषेक५०० on 13 March, 2016 - 11:55

कालच डोंबिवली येथे गझलांचा अप्रतिम कार्यक्रम झाला. अतिशय अप्रतिम गझल सादर झाल्या.. इतक्या अप्रतिम गझल ऐकायला मिळाल्या हे मी आमचे भाग्य समजतो.सर्व गाझलवेडे ह्या कार्यक्रमास जमले होते रसिकांनी अनेक मंत्रमुग्धतेचे क्षण अनुभवले.. हा अनुभव खरच शब्दात मांडता येणे कठीण आहे. "ती" चे सादरीकरण हि अप्रतिम होते.. एकंदरीतच कालची संध्याकाळ हि आमच्यासाठी भाग्याची,रसिकतेची संध्याकाळ ठरली..
गझल म्हणजे काय किवा एखादी कविता म्हणजे काय हे कालच्या कार्यक्रमानंतर माझे मत सांगावे तर मला असे वाटते, मात्रा येवो वा न येवो वृत्त माहिती असो वा नसो.. व्याकरण तसे महत्वाचेच परंतु भावनांनी शब्दात व्यक्त होणे म्हणजे गझल... एखादा कवी आपली कविता सादर करतो तेव्हा तो भावनांना शब्द्स्वरुपात वाट मोकळी करून देत असतो. तात्विक दृष्ट्या प्रगल्भता वाढत जाते आणि कवी किंवा गझलकार दिग्गज होतात...
मांडायला विषय नाही,विषयात आशय नाही मग होते ती केवळ यमकांची रांगोळी... मला असे वाटते हे अर्धवटपण आहे, अशक्तपणा आहे आपण आजारी कवी असल्याची जाणीव एखाद्या आजारी कवीला असायला हवीच.. आजारी असणे ह्यात दोष कवीचा नाहीच परंतु आपण अशक्त कवी आहोत, आजारी कवी आहोत हे मान्य करून, सुधारणा करून सशक्त व्हावे ह्यासाठी वाटचाल करायला हवी, प्रयत्न करायला हवेत परंतु आपला अशक्तपणा मान्यच न करणे ह्याला गुन्हा म्हणावा का??? असो असंख प्रतिभावान कवी जन्मा यावे ह्या इच्छेने मी हे लिहिले. त्यात कुणाला दुखावण्याचा हेतू नाही.
गझलेत किती सामर्थ्य आहे हे काल नव्याने पुन्हा कळले... माझ्या असे लक्षात आले कि शेराची सुरवातीची ओळ विषयाची सुरुवात करते आणि दुसरी म्हणजे शेवटची ओळ विषय संपवते..
दोन ओळींमध्ये सामावते ते सारे विश्व साऱ्या विषयाचा आशय,सार, आणि सारे काही.एका ओळीत विषय सुरु करायचा आणि दुसऱ्या ओळीत संपवायचा.. वाहः काय म्हणावे ह्या सामर्थ्याला
तू कधी देव पहिलायस का रे??? असे कोणी विचारले तर मी छाती ठोक पणे सांगू शकतो हो पाहिलाय देव मी प्रत्यक्ष.. ह्या गझलकारांच्या प्रतिभेतून दर्शन झाले त्याचे आणि झालो मी
धन्य धन्य...

धन्य ते कवी, धन्य ते गझलकार, धन्यधन्य हे सारे प्रतिभावंत.
ह्या अलौकिक अनुभवाबद्दल केवळ एकच म्हणू शकतो

धन्य झालो मी...
धन्यवाद...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users