पोच कळव गं उलट टपाली

Submitted by घायल on 12 March, 2016 - 13:17

पोच कळव गं उलट टपाली
------------------------------
कविता आत्मलक्षी असते , पण असं पण होतं ना कधी कधी कि
प्रेरणा रुसली तर तिलाही माघारी धाडून दिलं जातं.....

दारं खिडक्या बंद केल्यास
भिंतींनाही भाले फुटलेत
तुझ्याकडे येणारे रस्ते
साखळदंडात जप्त केलेत

तुझ्या माझ्यातील भिंत चिनी
शब्दावाचून सैराट प्रसरलीय
मंगोलियन योद्ध्यासारखी
भालाबर्ची निष्काम झालीय

चौकाचौकातून जयघोष होतो
मैफिलीत माझा सत्कार होतो
गलक्यात चित्त का ठरत नाही
तुझ्याविना मन रमत नाही

ए कविते, ऐक ना गा-हाणे माझे
पोच कळव गं उलट टपाली
जाणून आहे अंगणात माझ्या
भिरभिरते तुझी मूक सावली

- कपोचे
२२.२.२०१६

Group content visibility: 
Public - accessible to all site users