विसरली सांज एक

Submitted by माउ on 11 March, 2016 - 11:47

गंध हे जुने नवे
दाटती सभोवती
विसरली सांज एक
आठवांस मागती..

एक राग आनंदी
गारव्यास छेडतो
त्यातुनी सूर तुझा
जसा मनास वेढतो..

धुंदता इथे आता
सांजही निळावते
श्वास तू, ध्यास तू
आस ही फुलावते..

भास की किनारा हा
स्वप्न रुजून जाउदे
एकदा तुझ्या मिठीत
देह मुक्त वाहू दे...

रसिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users