एक रस्ता बंद झाला

Submitted by जयदीप. on 10 March, 2016 - 11:24

एक रस्ता बंद झाला....
जो खुला होता मिळाला!

पोचला नाही कुठेही
का विषय होता निघाला

हात थरथरणार होता
फार भरलेलास प्याला

काय होतो , काय झालो
काय झाले आपल्याला

फायदा होणार नाही
मग कशाला वाद घाला

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users