हो तुला परवडायचे नाही

Submitted by जयदीप. on 9 March, 2016 - 13:31

हो तुला परवडायचे नाही
म्हण तुला जे म्हणायचे नाही

काढ, रस्ता निघेल एखादा
वाट पाहत बसायचे नाही

सांग किंमत अवाजवी आता
जर तुला घर विकायचे नाही

काय स्वातंत्र्य बोलते आहे...
देशद्रोही म्हणायचे नाही ?

प्रश्न नंतर विचारला असता...
तेच उत्तर मिळायचे 'नाही'

छान तोवर जमीन आहे ही
ते पिकव जे विकायचे नाही

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users