दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट

Submitted by दिनेश. on 8 March, 2016 - 08:08

माझ्या भटकंतीच्या तारखा ठरलेल्याच असतात त्यामूळे भारतात यायच्या पुर्वीच मी सर्व बूकिंग करायला सुरवात केली होती. एरवी परदेशची सहल असली कि थॉमस कूककडे एक चेक दिला कि सर्व व्यवस्था ते करुन देत असत, यावेळेस भारतातलीच सहल असल्याने ( थॉमस कूकचे दुसरे ऑफिस ती व्यवस्था बघते ) मी सर्व तयारी करायचे ठरवले.

विमानाची तिकिटे, क्लीयरट्रीप वरून बूक केली. त्यांचा अनुभव चांगला होता. तिकिट इश्यू करण्यापुर्वी रिफंड पॉलिसी मला नीट समजावून सांगितली त्यांनी. दार्जीलिंगला एक टॉय ट्रेन आहे तिची २ तासाची जॉय राईड असते, त्याची माहिती वेब वरून मिळाली होती, पण त्याचे बूकिंग मात्र आपले आपण करावे लागते ( क्लीयर ट्रीप करू शकत नाही. ) तेही करुन टाकले. हॉटेलसाठी बूकिंग डॉट कॉम वर एक छान डील मिळाले. त्या प्रॉपर्टीबाबत सर्वानी छानच लिहिले होते. ते बूक केले. बागडोगरा ते दार्जीलिंग या प्रवासासाठी आयत्यावेळी सोय करता येण्यासारखी होती, पण ती घासाघीस करणे माझ्या रक्तात्तच नसल्याने ( ओके, नाही जमत मला ) मी टॅक्सी बूक करुन टाकली.
हॉटेल आणि टॅक्सीचे पैसे आधी भरायची गरज नव्हती.. सगळे बूकिंग झाल्यावर माझा मित्र डॉ. विवेक ला सांगितले ( येस, मी त्याला नेहमीच गृहीत धरु शकतो. )

भारतात आल्यावर फोन करून हॉटेल परत कन्फर्म केले. ( ते सगळे डीटेल्स बूकिंग कॉम वरुन मिळालेच होते ) टॅक्सीवाल्याने स्वतःहून इमेल करून, एअरपोर्ट वर कोण ड्रायव्हर येणार आहे व त्याचा फोन नंबर काय आहे,
ते कळवले होते.

आम्ही पहाटेच घरून निघालो. स्पाईसजेट चे मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते बागडोगरा असे विमान होते.
डोमेस्टीक विमानतळावर बर्‍याच वर्षांनी आलो होतो. फ्लाईटवर खाण्यापेक्षा ( हो त्यांच्या फ्लाईटवर खाणे
विकत घ्यावे लागते ) एअरपोर्टवरच खाउन घेतले. फ्लाईट वेळेवर होते. दिल्लीला पोहोचल्यावर जेवलो
आणि पुढचे विमान पकडले, तेही वेळेवरच होते. दोन्ही विमानात आम्ही थोडेफार खायला घेतलेच.

बागडोगरा हा मिलिटरीचा विमानतळ आहे ( फोटोग्राफीला बंदी आहे ) तरी नेहमीची विमाने बरीच येतात.
बाहेर पडल्यावर संदीप मोहरा हा ड्रायव्हर आमची वाट बघत उभाच होता. ( एअरपोर्ट ते एअरपोर्ट अशी टॅक्सी
बूक केली होती ) बागडोगरा हे गाव नेहमीच्या गावासारखेच वाटले. पण गाव सोडल्यावर लगेच मिलिटरी एरीया लागतो मग काही चहाचे मळेही लागतात. या महिन्यात चहाची झुडूपे पुर्णपणे छाटून टाकलेली असतात.

मग मात्र चढाचा रस्ता सुरु होतो. या रस्त्यावर अत्यंत कुशल चालकच पाहिजे. संदीपने टाटा जीप आणली
होती. वाटेत कुरसाँग गावी आम्ही चहा प्यायला थांबलो. तिथेच पहिल्रे मोमो खाल्ले. मला तरी तिथे फारशी
थंडी वाजत नव्हती.

तिथून दार्जीलिंग अजून उंचावर आहे, तिथे पोहोचल्यावर मात्र थंडीची जाणीव झाली. आम्ही निघेपर्यंत अंधारच पडत होता. तरी बरीच दुकाने उघडी होती. थर्मल वेअर आम्ही नेले होते पण तिथे स्वेटरही घेतला. मग
एका नेपाळी हॉटेलमधे नेपाली दम आलू आणि रोटी घेतली. अगदी साधे पण रुचकर जेवण होते.

मग डेकेलिंग रीसॉर्टवर पोहोचलो. ( या नावाची दोन हॉटेल्स आहेत. एक खाली गावात आहे ) आमचे हॉटेल
अगदी उंचावर होते तरी संदीपने अगदी सहज जीप नेली तिथे.

रुम बघून खुप छान वाटले. सिंटींग रुम आणि बेडरुम सेपरेट होत्या. भला मोठा टिव्ही तर होताच शिवाय हीटर
आणि फायरप्लेसही होते. बाथरुममधे चोवीस तास गरम पाण्याची सोय होती. रुमला लागूनच रीडींग रुम होती
आणि त्यात भरपूर पुस्तके होती. बाहेर बर्‍यापैकी मोकळी जागा होती आणि मला आकर्षित करतील
अशी भरपूर फुलझाडेही होती. ही जागा अगदी उंचावर असल्याने चालत जाणे जरा अवघडच होते ( आम्ही एकदा प्रयोग केला ) या रिसॉर्ट तर्फे दिवसातून एकदा गाडीने खाली गावात ड्रॉप आणि पिक अप, कॉम्प्लीमेंटरी
म्हणून देतात. पण आमची टॅक्सी असल्याने त्याची गरज वाटली नाही.

एकमेव तोटा म्हणजे तिथे ब्रेकफास्टला फारसा चॉईस नाही. आणि जेवण हवे असेल तर बरेच आधी सांगावे
लागते. पण आम्ही बाहेरच भटकत असल्याने, त्याचे काही वाटले नाही.

तर चला आता माझ्यासोबत..

१) बागडोगरातून बाहेर पडताना

२) चढाचा रस्ता

३) कुरसाँगला चहा प्यायला थांबलो तिथून दिसलेले दृष्य. ( झाडांच्या मधे पूर्ण सूर्यबिंब आहे, त्यावरुन
झाडांच्या उंचीची कल्पना करा )

४) तिथून समोर

५)

६) नुकतीच वसंताची चाहूल लागली होती.

७) नेपाली दम आलू, आणि रोटी

८) रीसॉर्टची बेडरुम

९) ब्रिटीशकालीन ड्रेसिंग टेबल

१०) सर्व सोयींनी युक्त बाथरुम

११) सिटींग रुम

१२ ) देखणी लँपशेड

१३) फायरप्लेस समोर गारठलेले डॉक्टरसाहेब

१४) सुसज्ज रिडींग रुम

१५)

१६) सज्ज्यातून दिसणारे दार्जीलिंग

१७) नाऊ सिट बॅक अँड रिलॅक्स.. दिनूबाबाचे फुलांचे फोटो येत आहेत..

१८) हि तिथली रानफुले, अक्षरशः कुठेही उगवलेली होती

१९ )

२० )

२१) हि पण रानफुलेच.. उभ्या भिंतीवर, कातळावर फुललेली होती सगळीकडे

२२)

२३ ) फुलांचे फोटो यायचेत अजून.. तोवर इथे न्याहारीला जाऊ या..

२४)

२५)

२६)

२७) या रिसॉर्टचे स्वतःचे ऑर्किड कलेक्शन आहे, त्यापैकी काही.. ( जी फुलली होती ती )

२८)

२९)

३०)

३१)

३२ )

३३) ब्रेकफास्ट हवा तर इथेही देतात...

३४)

३५)

३६)

३७) या फुलाच्या मी प्रेमात.. पण फार उंचावर होते, क्लोजप मिळाला नाही.

३८)

३९)

४०)

४१)

४२)

४३)

४४)

४५) ब्रेकफास्ट ला थोडा वेळ होता, म्हणून जरा खाली उतरुन आलो होतो..

४६) ही ब्रेकफास्ट रुम

४७) तिथल्या भिंतीवरची फ्रेम

४८)

४९)

हि सगळी फुले त्या रिसॉर्टच्या आवारातलीच...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व सोयींनी सुसज्ज रीसॉर्टमध्ये कमोड नव्हता का? त्याचा फोटो नाही दिसला.. ! Proud

फुलांचे फोटो छान आहेत. हॉटेल रूमपेक्षा परिसराचे अजून फोटो आवडले असते. ह्या मालिकेत सिक्कीमही कव्हर होणार का?

आँखोंकी ठंडक......... नुस्तं आहाहा होतंय...कूल आणी ऑसम...

तुझ्या डीटेल वर्णनामुळे त्या त्या स्थळाची नीट कल्पना येते.

वा... दिनेशदा.... झकास

दार्जीलिंग मला आवडणार्‍या ठिकाणांपैकी....

आर्थात मी तिकडे जाउन २० वर्ष झाली !!! ही जागा सुरेख आहेच पण त्या बरोबर माझ्या मर्मबंधातली ठेव आहे. कारण १९९६ ला ही ट्रीप मी केली माझ्या आई आणि इतर काही मैत्रीणीं बरोबर.... आणि मग माझं लग्नच झालं ३-४ महिन्यात...... त्या मुळे मिस. मीरा म्हणुन आई बरोबर केलेली आणि मुक्त पणे काहीही न आखता केलेली ही माझी शेवटची ट्रीप.....

तुमचे फोटो पाहुन आठवणी जागवणार.....परत जायचे आहे नवरा आणि मुली सोबत... पण भिती वाटते की ह्याही ठिकाणाची काश्मीर किंवा सिमल्या सारखी वाट लागली तर नसेल ना?

मस्त फोटो... फोटो १४-१५ पाहुन लुटेराची आठवण झाली. फोटो २६ पाहुन पाण्याच्या थेंबांचे कळे झालेत की काय वाटले Happy

दार्जिलिंग माझ्याही विशलिस्टीत आहे. पुर्ण सात बहिणीच पाहायच्यात एकत्र. बघुया कसे आणि कधी ते.... Happy

आभार मित्रांनो,

पराग, सिक्कीम नाही जमले यावेळेस.

मीरा, खरं सांगायचे तर स्वच्छतेच्या बाबतीत निराशाच झाली. ( मे बी, मी अलिकडेच भेट दिलेल्या देशांनी माझ्या
अपेक्षा वाढवून ठेवल्या असतील ) पण टिपीकल भारतीय छोट्या गावातील निरागसपणा अनुभवला. टॅक्सी आणि हॉटेलचे पैसे घ्या, घ्या म्हणून मलाच मागे लागावे लागले. ड्रायव्हरला आमच्याबरोबर जेव, म्हणून बराच आग्रह करावा लागला )

साधना, अगदी तसेच घर होते हे. खुपशी ब्रिटीश लोकांनी बांधलेली घरेच आता हॉटेल्स झालीत पण बर्‍यापैकी मेंन्टेन केली आहेत.

अजून काहि भाग यायचेत....

मस्त. तुम्ही किती लकी आहात. इतके फिरत आहात.
बागडोगरा मला पण जवळचे वाट्ते. एक आर्मीतले जोडपे आमचे क्लोज फ्रेंड होते ते तिथे पोस्टेड होते.
मुलगा कायम बागडोगरा जलपाईगुरी करत असे. टॉय ट्रेनचे भाग लवकर येउद्या.

दिनेश दा, खूप छान माहिती. मी हि जायचा विचार करतोच आहे. पण साधारण सिक्कीम व दार्जीलिंग एका सोबत करण्यासाठी किती दिवस हवेत.

जय.. किमान ८ ते १० दिवस हवेत. ती दार्जीलिंग टुरिझम ची साईट पहा, डिटेलमधे माहिती आहे. पण ऐन सिझन मधे जाणार असाल, तर आतापासूनच प्लान आणि बूकिंग करावे लागेल.

दिनेश दा,

सुरुवातीचे फोटो एलीफंट झोन मधले आहेत का हो?? बहुतेक हा पुर्ण रस्ताच एलीफंट झोन मधे आहे, बागडोगरा सिलीगुड़ी कुरसेयांग दार्जिलिंग रूट, तिथे जागो जागी एलीफैंट क्रासिंग बोर्ड्स लावलेले सापड़तात.