दिवस ढकलायला शिकलास तू

Submitted by जयदीप. on 8 March, 2016 - 01:02

दिवस ढकलायला शिकलास तू
कसा तोवर इथे रमलास तू

मिळाली दाद कोणाची तुला
कुणाला एवढा कळलास तू

कुठे जाणार होती वाट ती
वळण नव्हते तिथे वळलास तू

तुला कोणीच नाही पाहिले
मलासुद्धा कुठे दिसलास तू

प्रवाहाधीन नव्हते व्हायचे
किती मग एकटा पडलास तू

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users