साक्षात्कार!

Submitted by mrsbarve on 6 March, 2016 - 22:54

लेक्चर संपून कैम्पस च्या बाहेर पडुन त्या महा प्रचंड पार्किंग लॊ ट मधून आपली गाडी एकटीच उरलेली असते तेंव्हा रात्रीचे अकरा वाजलेले असतात . भरपूर धुकं पडलेलं असतं ,थंडीही . कुडकुडत जैकेट विसरल्याचा वैताग करत गाडीत बसलेले असते दोन मिनिटं ,आजचा दिवस अजुनी संपलेला नसतो.

धुक्यात रस्ता चुकतो. नवर्याला फोन करावा तर रस्त्यात कुठे तरी थांबावे लागेल ,आजू बाजूला फक्त धुके आणि अंधार आणि टेकड्या आहेत. यु टर्न घेऊया आधी ,मग बघु. साल हे धुकं डेंजरच गड्या , हे काय आहे कोल्हा ? मरो! मी नाही थांबणार. अरे आजू बाजूला अज्जिबात गाड्या नाहीत . कि धुक्यात दिसत नाहीत . सेल वरून सिरीला विचारू कुठे आहे ते ! सेल पर्स मध्ये पैसेंजर सिट पाशी खाली पडलाय . वा रे वीर !

मेलं पुढचा सिग्नल लौकर यायला हवा तोही नाही येत्त ! मोर्या !

अरे वा !आला कि सिग्नल !चला यु टर्न !हेहे! नो यू टर्न !हेहे !पुढचा सिग्नल मिळेलच की! नशीब फ्रीवे नाहीये नाय तर टोर्टिया खायला मक्कूमामा च्या देशात पण वेण्त्री मारली असती ! वा हा अतिशयोक्ती अलंकार आणि फारसा फनी विचार नाही आहे .

हेहे मज्जा येतेय ,पाच दहा च्या स्पीडने खेळत खेळत ड्राईव ,भीती वाटावी अस कूणी नाहीच आहे आजु बाजूला … अंधार आणि धुकं…

घेतला यु टर्न !

वैताग नाही ,भीती नाही ,भूक लागली आहे पण ठीक आहे ,फ्रीज मध्ये सूप आहे .

मी आता चक्क कूल आहें ! मला खात्री आहे माझीच !!

कारण

कारण मी कुणावरही उपकार ,म्हणून हे करत नाहीय ,हे मी माझ्यासाठी करत आहे!

ज्जे ब्बात !

जिवणीच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत साक्षात्काराच हसू !

चला आलंच घर ! येइलच !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users