एक आकाश वेगळे झाले

Submitted by जयदीप. on 4 March, 2016 - 00:36

एक अाकाश वेगळे झाले
एक आकाश मोकळे झाले

सर्व होते तसेच अाहे की
कोण इतक्यात आंधळे झाले

एक दुष्काळ पाहुणा आला
मग नदीचे तुझ्या तळे झाले

काय आकार बदलला त्यांचा
जे प्रवाहात अडथळे झाले

कोण काळे दिसायचे आधी
कोण बरसून सावळे झाले

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users