पैलतीरावर कुणीही पोचला नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 3 March, 2016 - 23:09

आपला जो वाटला तो भेटला नाही
भेटला जो वाटला तो आपला नाही

स्पष्ट नाही मांडता आला तुला मुद्दा
तेवढा त्याला गहन ही वाटला नाही

जाणता सोडून मागे चालता झाला
नेणता पर्यन्त माझ्या पोचला नाही

साचलेले सर्वकाही वाहते झाले
पावसाचा जोर काही थांबला नाही

ऎलतीरावर उतरले हे बरे केले
पैलतीरावर कुणीही पोचला नाही

जाणणे ठरते स्वतःला जीवघेणे अन..
जीव जाईतो स्वतःला जाणला नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>साचलेले सर्वकाही वाहते झाले
पावसाचा जोर काही थांबला नाही>>>वा व्वा!

>>>ऎलतीरावर उतरले हे बरे केले
पैलतीरावर कुणीही पोचला नाही>>>मस्त!