जकात

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 06:43

जकात

मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या टिचभर परगण्यात
तरी त्यांची ये-जा कुठे असते?

मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या इवल्याशा वेदनेला
सुद्धा का त्यांनी तडीपार केलंय?

मला चांगले ठाऊक आहे,
दूर देवदूतांच्या प्रदेशात
मला प्रवेश नाहीये.

पण माझ्या तीळभर सुखावर
का त्यांनी जकात बसवलीय?

बापू.
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/106824.html?1145345529

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users