बंदीश

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 03:01

बंदीश
(मला) अज्ञात असलेल्या एका इंग्रज कविच्या काव्यपन्क्ति :
स्वीट दो वेअर
मेलडीज यु संग
स्वीटर स्टिल वेअर
द वन्स, अनसंग...

त्यांचा भावानुवाद:

गायिल्यास किती तू आर्त विराण्या,
गोडी त्यांची अपूर्व अवीट होती.

दीर्घ वळणावर एका, येताच थबकूनी,
वेधलीस तू भैरवी, क्लांत डोळे मिटुनी.

आत अवघा गाभारा नीरवाने भरला,
निरांजनाची ज्योत नाजूक, थरथरली.

सरली वाट, निखळले पाश शेवटले,
दिव्य स्वरस्पर्शाने,सोने त्यांचे झाले.

बंध सारे विस्कटूनि, बंदीश बहरली,
न गायिलेल्या त्या गीताची, गोडीच न्यारी.

त्रिसप्तकी तान तल्लीन, तूच गाता, तूच श्रोता,
ताल एक, नाद एक, लयीत विलय एक मात्रा.

बापू करंदीकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users