बंदा रुपाया

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:53

बंदा रुपाया

ऊंच टाचांचे बूट घातलेली ऊंच बाई
हातात जडसर ब्यागा घेऊन दोन,
लगबगीने रस्ता ओलांडत निघालेली.
कडेला बसलेला मळकट भिकारी काटकुळा
घामट बरगड्या बडवून म्हणतो,
'गरीबाला पैसा'...
दुर्लक्ष करुन त्याच्याकडे, बाई चालू लागते
तशी तिच्या सावलीला अचानक,
होतात डझनावारी पिल्ले.
कर्कश किंचाळत, नाचू लागतात
फेर धरून, तिच्या भोवती.
भिकार्‍याच्या ताटलीत कोणीसे येऊन
भिरकावतो एक बंदा रुपाया.
दातपडक्या बोळक्यातून त्याच्या,
ओशाळवाणे हासू फिदफिदते.
बाईकडे बघून तो पिचके डोळे मिचकावतो
तर त्यातून आणखी सावल्या सांडतात.
ब्यागा सावरत, सावल्यांना हुसकावताना
बाईची होते पुरेवाट.
बाई भेलकांडते, कडमडते.
तिच्या बूटान्च्या टाचा
आकाशाकडे लावतात डोळे.
तीची निष्फळ झटापट बघून,
कोपर्‍यावरच्या पोलिसाची डुलकी भंगते.
काहीतरी करायला हवे म्हणून
तो फराफर शिट्टीच फुंकत सुटतो,
अगदी तोंडाला फेस येईपर्यंत.
शिट्टीचा आवज विरत, विझत, थिजतो
त्याचीही होते एक सुरेख सावली. . .
'घे बाबा तुला रुपाया
भाऊ माझा शिपाया'.

बापू
http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/94245.html?1136867549

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users