चकित

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 01:19

चकित

विपर्यासाच्या सोनेरी कांकणाची मगरमिठी
अपसमजाची बेडी जाड मजबूत लोखंडी.

ना विस्मय ना वाटला कधी खेद
ओळखीचेच हे, अनर्थाचे उच्छाद.

रोजच पडतात माझ्या आंगणात सडे
त्याच्या अमंगल विष्ठेच्या दुर्गंधाचे.

तरी आणतो भरूनी नव्या शब्दांचे घडे,
विक्रमाला जसे येते वेताळाचे बोलावणे.

माझ्या या वांझ खटाटोपाने
माझे मलाच चकित व्हायला होते!

बापू.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users