चंद्र काही वस्तीत होते

Submitted by vilasrao on 25 February, 2016 - 21:37

गजल : "चंद्र काही वस्तीत होते"

धावपळ तर भलतीच होते
आजची मग तजवीज होते

भांडतो जर अपवाद असले
गूण जुळले छत्तीस होते

वृद्ध पडल्यावर हासले जे
दात त्यांचे बत्तीस होते

चोरले त्यांनी देव जेव्हा
ते कुठे त्या वस्तीत होते

चांगले त्यांना काय सांगू
ते खरेतर मस्तीत होते

शोधले सारे चोर आम्ही
तेच तेव्हा गस्तीत होते

रात्र काळोखी लख्ख झाली
चंद्र काही वस्तीत होते

मानसातच मानूस बघता
आज ही पण सलगीच होते

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users