पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रख्यात डॉक्टरांबद्दल माहितीची देवघेव

Submitted by रंगासेठ on 25 February, 2016 - 02:45

नमस्कार

वेगळ्या धाग्यावर पुणे शहरातील डॉक्टर्सची अत्यंत उपयुक्त माहिती मिळतेय, पण पिं.चिं. / पिंपळे सौदागर/ वाकड/निगडी/ आकुर्डी येथील डॉक्टर्सची माहिती मिळत नाहीये.

या धाग्यावर आपण पिंपरी / चिंचवड / पिंपळे सौदागर / पिंपळे निलख/ वाकड / निगडी / आकुर्डी / चिखली / मोशी मधील चांगल्या डॉक्टरांबद्दल जितके माहितीवर्धक लिहिता येईल तेवढी माहिती लिहूया. त्यांचा फोन क्रमांक, पत्ता, कशासाठी प्रसिद्ध, त्यांच्या कामाच्या वेळा, आलेला अनुभव इत्यादी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आदित्य बिर्ला हॉस्पिटलचा माझ्या नातेवाईकाचा अनुभव वाईट आहे.पुढच्या खेपेस,त्याने निरामय निवडले.

योग्य काय ते कळेनासे झाले आहे.>>>>>> माझ्या आईचेच एक उदाहरण आहे.मुंबईतल्या एका जानामान्या हॉस्पिटलबद्दल तिच्या मनात पूर्वग्रह होता.सकाळी नोकरीच्या जाण्यायेण्याच्या वेळी आठवड्यातून ३-४ वेळेस डेड बॉडी आणताना दिसायचे.त्यामुळे ते हॉस्पिटल आणि मृत्यू यांची तिने घट्ट सांगड घातली होती.एवढे मोठे हॉस्पिटल्,त्यात कोणीना कोणीतरी जात असेलही म्हणून तिला सांगायचो.
नंतर माझ्या मुलाला तिथे ठेवले होते.तिचीही अँजिओग्राफी,ब्लास्टी तिथेच झाली होती.
आपले नशीब चांगले असले तर डॉक्टर्,त्यांचे डायग्नॉसिस चांगले असते.

अमुक एक डॉक्टर चे अनुभव, बऱ्याच ठिकाणचे रिव्ह्यू वाचून आणि हॉस्पिटलमध्ये किती जास्त डायग्नोस्टिक उपकरणे आहेत यावर निर्णय घेता येईल टू बी सेफर साईड.म्हणजे हवा तो डॉक्टर त्या हॉस्पिटलमध्ये येत असेल तर तिथे ऍडमिट.
काही हॉस्पिटल चांगली असतात पण त्यांच्या व्हिजिटर आणि इतर पॉलिसी आपल्याला सूट होणाऱ्या नसतात.त्यांच्या अडचणी, सुरक्षितता हे सर्व मुद्दे बरोबर असले तरी सेवा करणाऱ्याची खूप अडचण होते.
हिंजवडीत एक हॉस्पिटल आहे जिथे पेशंट ला हॉस्पिटल चेच खाणे घ्यावे लागते.व्हिजिटर नी (फळे सुद्धा) नेणे परवानगी नाही.इथवर पण ठीक आहे.पेशंट बरोबर राहणाऱ्या ला पैसे देऊनही हॉस्पिटल खाणे परवानगी नाही.एक नवं लग्न झालेली मुलगी ऍडमिट होती.फक्त नवरा बरोबर.माहेर सासर अगदी लांब च्या गावी.अपेनडिक्स आणि अनेक टेस्ट.नवरा सगळं सांभाळून, नोकरी सांभाळून इस्कॉर्ट करणार.त्यातही जेवायच्या वेळी बाहेर हॉटेल शोधून जेवणार.आता बदलली असेल परिस्थिती. ही 2 वर्षांपूर्वीची गोष्ट.
जिथे मोठे आणि डायग्नोस व्हायला थोडे किचकट आजार असतील तेथे शक्यतो 35+ आणि मोठ्या डॉक्टर्स बरोबर केसेस हाताळलेला डॉ निवडावा(मला माहित आहे वाक्य खूप अज्ञानी रेसिस्ट एजिस्ट वगैरे आहे.पण अनुभवाचे बोल.)

मोठ्या हॉस्पिटलात खाणे नेणें अलावूड नसतेच , कारण डाएटशीयनने खाणे ठरवून दिलेले असते ,
ऑपरेशनच्या पेशनतला फळ , प्रसाद दिले अन मग सर्जरी केन्सल करावी लागली , असे घडते,
नारळपाणी आरोग्यदायी म्हणून लोक प्रेमाने नेतात , पण किडनी पेशनटला ते देऊ नये हे लोकांना माहीत नसते.

मोठ्या हॉस्पिटलात घरचे खाणे पेशंट ला हवे असेलच तर डॉकटर व डाइतिशीयनची परवानगी घ्यावी , तसा कधी कधी गेट पास बनवून घ्यावा लागतो व तो सिक्युरितीला दाखवला तरच तो खाणे आत सोडतो

त्याबद्दल म्हणणे नाहीच हो.पेशंट बरोबर आलेल्याला खाणे ओव्हर प्राईज्ड असूनही विकत घेऊन तिथे मिळणार नाही याबद्दल मूळ आक्षेप होता.तरुण कंपॅनियन चं ठीक आहे.जिथे आजी आजोबा मधले आजोबा किंवा आजी ऍडमिट आणि दुसरा केअरटेकर तेथे अश्या पॉलिसीज किचकट वाटतात.

त्यावरून निरामय हॉस्पिटलमधला एक किस्सा आठवला.एका डायबेटिक पेशंटची शुगर आटोक्यात येत नव्हती. डॉक्टर्स हैराण झाले होते.डायेट सांगितले होते त्यानुसार देत होते.तरी शुगर कमी होत नव्हती.मग कळले की त्याची बायको फळांचे रस त्याला देत होती.मग घरचे अन्न अजिबात मना केले.

त्यावरून निरामय हॉस्पिटलमधला एक किस्सा आठवला.एका डायबेटिक पेशंटची शुगर आटोक्यात येत नव्हती. डॉक्टर्स हैराण झाले होते.डायेट सांगितले होते त्यानुसार देत होते.तरी शुगर कमी होत नव्हती.मग कळले की त्याची बायको फळांचे रस त्याला देत होती.मग घरचे अन्न अजिबात मना केले.

डॉ लोक खूप नीट सांगतात पण.एक डॉ होते ते पेशंट ला भेटायला आलेल्या प्रत्येका समोर आणि नातेवाईकांना पण परत परत सांगायचे की तुम्हाला चांगले म्हणून द्यावे वाटेल पण पेशंट ला नारळ पाणी अजिबात द्यायचे नाही.जीवाला धोका आहे.
'फळांचे रस' 'गूळ चालेल.त्याने काही होत नाही' 'कॉफी चालते.दूध जातं पोटात.''आईस्क्रीम ने काही होत नाही.त्यात पौष्टिक फळं आणि दूध असतं' वगैरे समजुतींनी झालेलं नुकसान सर्वज्ञात आहेच.तरी व्हॉटसप फेसबुक युनिव्हर्सिटी मुळे काही चांगल्या पोस्ट पण गैरसमज दूर करतायत.ज्यांना ऐकायचेच नाही त्यांचे कोणी काही करू शकत नाही.

नारळपाणी आरोग्यदायी म्हणून लोक प्रेमाने नेतात , पण किडनी पेशनटला ते देऊ नये हे लोकांना माहीत नसते.>>>> +१११ तुम्ही डॉक आहातच पण हे मी सा. सकाळ मध्ये पण वाचले होते. कारण नारळपाण्यातल्या घटकांमुळे किडनीवर ताण येतो. बहुतेक पोटॅशियम का असाच काहीतरी घटक असावा. तो लेख एका डॉक्टरनेच लिहीला होता.. पण लोक ऐकत नाहीत.

निरामय चांगलेच आहे. आमचे एक नातेवाईक तिथेच अ‍ॅडमीट होते. डॉक व इतर लोक व्यवस्थीत काळजी घेतात.

पुण्यामध्ये अश्या काही सस्था आहेत का.... ज्या गरजु असेल तर मेडीकलचा खर्चासाठी मदती चा हात देतात.... किंवा कमी खर्चात ट्रिटमेंट करतात... माझ्या एका ओळ्खीतल्या व्यक्ती ला खुप गरज आहे..

डॉ राहुल देव , स्वामिनाथन क्लिनिक पिंपरी उत्तम गायनक आहेत
डॉ सोनल बोन्द्रे , रावेत भोंडवे कोर्नर

डॉ प्रियंवदा शाह, हिलींग टच हॉस्पिटल
थोडी बॉर्डर ओलांडायची असल्यास डॉ मिता नाखरे व्हायटालाईफ औंध किंवा रत्ना मेमोरियल हॉस्पिटल सेनापती बापट रोड

पिंची भागातील केस (स्किन ) स्पेशालिस्ट सांगा ,

केस गळायला लागलेत , पुंजके पडत आहेत, कोंडा नाहीये.
इथे मागे कोणी डॉक्टर पेठे सांगितले होते त्यांचा पत्ता आहे का?
किंवा इतर कोणी केसां साठी सुचवा

डॉ माधवी झेंडे. संस्कृती आर्केड,छत्रपती चौक,वाकड.
9158822525
आधी appointment घ्या मग जा. वेळ रोज संध्याकाळ 6ते 9.30. रविवार बंद.

शाहीर , सध्या घरगुती उपाय सांगते, डॉ शी भेट होईपर्यंत. साखर न घालता चहा करायचा. जरा १ कप जास्तच करायचा. ती गाळलेली पावडर अर्धा कप पाणी घालुन परत उकळायची. ते पाणी कोमट झाले की गाळुन घ्यायचे. त्यत २ थेंब लिंबुरस टाकायचा. नाहुन झाले की शेवटी हे चहाचे गाळलेले पाणी केसांवर ओतुन घ्यायचे. केस जुन्या टॉवेलने पुसायचे कारण चहाचा रंग लागु शकतो. नंतर परत पाणी डोक्यावर घ्यायचे नाही. ( पुरुष रोज केस धुतात म्हणून सांगीतले ) याने बराच फरक पडतो. डॉ तसेही तुम्हाला थॉयरॉईड चेक केले का तेही विचारतील. बेस्ट वे, शांपु बंद करा. चक्क रीठा शिकेकाई पावडरने नहा.

रश्मी, म्हणजे दूध +पाणी+चहा पावडर उकळून गाळून घेतल्यावर गाळण्यातली चहा पावडर वेगळ्या पाण्यात घालून उकळून घ्यायची का ते पाणी डोक्यावरून घ्यायला?

वर्णिता, मी चहा करतांना त्यात दूध घालत नाही, नंतर कपात घालते. त्या मुळे शक्य असेल तर कपात आधी दूध व साखर घालुन मग उकळलेला चहा ओतला, तर तेच चहाचे पाणी जादा पाणी मिक्स करुन उकळुन वापरता येईल.

थोडक्यात ज्यांना नेहमीच्या दूध साखरेच्या चहाची सवय आहे त्यांनी अंघोळीला जायच्या आधी बिना साखरेचा ब्लॅक लेमन टी बनवायचा. एक घोट घ्यायचा. त्यांना चव अवडणार नाहीच. मग तो घेऊन अंघोळीला जायचे आणि अंघोळीच्या शेवटी तो डोक्यावर घ्यायचा.

धन्यवाद , सौ चे केस डिलिव्हरी नंतर सहा महिन्यांनी गळायला सुरुवात झाली आहे, घरगुती उपाय करून झाले , वरचा उपाय करून बघतो , धन्यवाद

शाहीर, मग हे खूप नॉर्मल आहे असं मला वाटतं. प्रेग्नन्सी मध्ये केस कमी गळतात त्यामुळे तेंव्हा न गळलेले केस डिलिव्हरी नंतर गळतातच. कोणतेच उपाय कमी येणार नाहीत.

प्लस प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरी दरम्यान शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ते ही एक कारण आहे केस गळण्याचं

आणखी एक, जर या दरम्यान, ब्रेस्टफीड करतानाही शरीरात काही डीफिसीएनसीज निर्माण झाल्या असतील तर त्याचाही केसांवर परिणाम होतो.

माझा मुलगा जानेवारी मध्ये 2 वर्षाचा होईल पण मी अजूनही या प्रेग्नन्सी + फिडिंग दरम्यान तयार झालेल्या डीफिसीएनसीजशी डील करतेय

डेन्टल इम्प्लान्ट करणर्या प्रख्यात डेन्टीस्ट यान्ची नावे सुचवाल का? त्यान्ची फी प्रत्येक इम्प्लान्ट मागे काय असते?

मी 2 केले होते
दात काढणे, टाके, टायटॅनियम स्क्रू बसवणे सहित उपचार xरे सगळे मिळून 32000 पर दात पडल्याचे आठवते.
पण यापुढे करेन असं वाटत नाही.

Pages