कटकट राहू दे

Submitted by तुषार जोशी on 24 February, 2016 - 09:53

भाजी जर आंबट.... राहू दे
आज तरी... कटकट राहू दे

टाकु नको रॅपर टॉफी चे
आठवणी अनवट... राहू दे

तुझी वादळी ओढ तरी पण
शेवटचे हे तट राहू दे

सात समुद्राच्या या भिंती
मेसेंजर ची फट राहू दे

डोळ्यांनी मी मागितल्यावर
म्हणावेस तू... हट राहू दे

तुष्की नागपुरी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy ममता ताईंच्या त्याच गझलेचे मिटर या रचनेच्या प्रेरणास्थानी आहे. हे लिहितांना त्यांची गझला लिहिण्याची शैली मनात होती म्हणून ही रचना त्यांनाच अर्पण रचना आहे.