बेट एखादे

Submitted by जयदीप. on 23 February, 2016 - 13:46

....................................
नकाशावर नसावे बेट एखादे
असेसुद्धा मिळावे बेट एखादे

तुटत जातील त्याचे काठ भरतीने
कशाला वाढवावे बेट एखादे

निसर्गाची असावी साथ जोडीला
तुझे- माझे असावे बेट एखादे

समुद्राचीच ज्यांना माहिती नाही
कसे त्यांना कळावे बेट एखादे

कुणीही येत नाही, जातही नाही
किती निर्जन बनावे बेट एखादे

..............................जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडेश Happy