कोण मुद्दल मागतो आहे परत

Submitted by जयदीप. on 22 February, 2016 - 22:23

ठार वेडा बोलला माझ्यातला
वेड नाही लागले आहे मला

टाळली होतीस तू चर्चा कधी
हा विषय इतक्यात नाही वाढला

कोण मुद्दल मागतो आहे परत
केवढा विश्वास होता ठेवला

हा तुझा पहिलाच तर होता गुन्हा
हात का नाही जराही कापला

ती किती धरणार आहे तग इथे
जन्म इच्छेने कशाला घेतला

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users