कोरडा मल्हार

Submitted by vilasrao on 20 February, 2016 - 12:27

गजल :"कोरडा मल्हार!"

जेव्हा कधी मनाला माझ्यात शोधतो
मज आरसा मनाचा टाकून बोलतो !

झाल्या मलाच वैरी प्रतिमा मनातल्या
घायाळ रोज होतो मी हात जोडतो !

गाऊन फायदा नाही राग अंतरी
हृदयात कोरडा मी मल्हार पाळतो !

आभाळ ओळखीचे आहे तसे मला
ह्या सोबतीत माझा मी मार्ग शोधतो !

हृदया अशी मदीरा आहेच औषधी
जखमाच खोल ह्या भरण्या वेळ लागतो !

विलास खाडे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आभाळ ओळखीचा आहे तसा मला ....

>>. विलासरावोजी , गझल आवडली.
आभाळ ओळखीचे आहे तसे मला .... असा बदल सुचवावा वाटले.