सेल्फ ड्रिवन रेंटल कार ( भारतात )

Submitted by सावली on 18 February, 2016 - 01:46

भारतात सेल्फ ड्रिवर रेंटल कार्सचा अनुभव कुणाला आहे का? कार्स कंडीशन कशा असतात? कस्टमर सपोर्ट मिळतो का? कुठल्या कंपन्या चांगल्या आहेत?

दिल्लीहुन जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ला जायला सेल्फ ड्रि. कार बुक करावी का असा विचार करत आहे. कुणाला अनुभव असल्यास प्लिज शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सावली, झूमकार्स एक बरी साईट आहे. बरेच चांगले अनुभवही ऐकून आहे. काहीतरी ५०००/- डिपॉझिट घेतात आणि फ्यूलसकट गाडी मिळते. फ्यूल भरावं लागलं तरी त्याचे पैसे परत मिळतात (अर्थातच बिल दाखवून). पर्सनल अनुभव मात्र नाही.

फु स - डायरेक्ट ठाणे-दिल्ली-कॉर्बेट पार्क-दिल्ली-ठाणे अशी टूर एक्स्युवी५ओओ नी का नाही करत? दोन डायव असले की झालं! Happy Light 1

I am not sure if such cars are available but just a advise - Don't drive on that road on weekends as there will be lot of traffic. Otherwise road is good. Use Muradabad bypass.

हैद्राबादेत अशी गाडी मिळेल का? हैद्राबादच्या ५ दिवसाच्या ट्रीप्साठी सेल्फ ड्रिव्हन कार रेंट वर घ्यावी का ड्रायव्हरसकटची कार?

मस्त.
सावली, तुझं काम झालं की हेडर बदलून भारतात सर्वच ठिकाणी अशी कार मिळते का? वगैरे संदर्भाने पोस्ट टाकशील का?

हे असं काहीतरी फार गरजेचं आहे.

थँक्स अवनी, झुम, माइल्स - कार्झऑनरेंट इत्यादी आहेत पण सर्विस कशी आहे हा प्रश्न.

मंजूडी , बघते ती साईट

योकु, थँक्स.
ठाणे-दिल्ली-कॉर्बेट पार्क-दिल्ली-ठाणे >> हा हा. नवर्याचा तोच प्लान होता. अजुनही तो तसच करायच्या मागे आहे. आम्ही दोघे ड्रायवर आहोतच.
पण वन वे १६५० किमी आहे मग मधे वन/टू नाईट स्टे कुठेतरी करावा लागेल म्हणजे दिवस वाढतील. शेवटचा टप्पा रस्ता खराब आहे त्याला वेळ लागेल वगैरे बर्याच गोष्टी...

थँक्स मंदार, ओके विकेंड अवाईड करुन , नीट मॅप बघुनच जाईन. लेटेस्ट रस्ता कंडीशन कशी आहे?

वेल, वर लिहीलेल्या सर्विस आहेत सगळीकडेच बहुतेक आता. फक्त क्वालिटी मॅटर्स. पण समजा तुम्हाला शहरात चालवायची आहे तर काहीच प्रश्न नसावा. काही झालं तर लगेच सपोर्ट मिळेल. आम्हाला जंगलात न्यायची म्हणुन जास्त प्रश्न Wink

नीधप, आहेत अशा सर्विसेस बहुतेक ठिकाणी वर नाव दिलेल्या कंपन्या बघ.
तसा धागा हेडर भारतात सर्व ठिकाणी अशाच प्रकारचा आहे. नंतर मुळ पोस्ट पण बदलेन हवंतर.

झूम कार चांगली आहे.. ओळखीच्या एका डॉक्टरांनी दिल्ली - जिम कॉर्बेटसाठीच घेतली होती... गाडी घेताना सगळी कंडिशन व्यवस्थित बघून घ्यावी लागते.. आणि जितके ड्रायव्हर आहेत त्या सगळ्यांचे लायसेन्सेसची फोटोकॉपी जमा करायची...

गिरीकंद पण चांगली आहे.. आम्ही नेली होती एकदा गाडी.. गाडीला प्रॉब्लेम आल्यावर त्यांचा माणूस दुसरी गाडी घेउन आला होता... थोडा वेळ लागला पण तो आला.. आणि मग नवीन गाडी घेऊन आम्ही पुढे गेलो..

झुम, माइल्स - कार्झऑनरेंट , सर्विस चांगली आहे , मी ज्या ज्या वेळेस इंडिया त जातो त्या त्या वेळेस पुण्यात वापरतो ८ ते १० दिवस साठी , झुम सर्विस बेस्ट

मागे एका व्यक्तीचा ब्लॉग वाचनात आला होता. त्यात अशा कार रेंटल्स कंपनीचा रिव्ह्यु होता. सापडला तर देते लिंक.

अरे वा फर्स्ट हँड अनुभव म्हणजे मस्तच! मायबोलीवर नेहेमीच अशी मदत मिळते. Happy

थँक्यु हिम्सकूल, महेन्द्र ढवाण , मनीष.
हिम्सकूल, त्या डॉक. नी दोन चार दिवसासाठी घेतली असेल ना? आणि कुठली गाडी घेतली होती. नंतर पेमेंट करताना काही जास्त पैसे उगाचच मागायचा वगैरे अनुभव आला का? प्लिज शक्य असेल तर लिहा इथे.
पेरु, ब्लॉग लिंक मिळाली तर प्लिज शेअर करा.

सावली, मी दिल्लीहून ४ वेळा कॉर्बेट ट्रीप्स केल्या.
NH-24 ने मोरादाबाद बायपासपर्यंत रस्ता चांगला आहे पण प्रचंड ट्रॅफिक असतं त्या रोडवर. दिल्ली-गाझियाबाद-हापूर-गजरौला पर्यंत पुष्कळच ट्रॅफिक. मग मोरादाबाद बायपास ने काशीपूर मार्गे कॉर्बेट.

मोरादाबाद-काशीपूर रस्त्यावर बर्‍याच ठिकाणी रस्ता अतिशय खराब अवस्थेत आहे. ( उत्तर प्रदेश. ) पुढे काशीपूर-कॉर्बेट चांगला आहे. रात्री पण ड्राईव्ह केलंय, सेफ आहे.

हैद्राबादेत अशी गाडी मिळेल का?
हो तर, zoomcar, carzonerent वगैरे इत्यादि इथेही आहेत.

हैद्राबादच्या ५ दिवसाच्या ट्रीप्साठी सेल्फ ड्रिव्हन कार रेंट वर घ्यावी का ड्रायव्हरसकटची कार?
इथली ट्राफिक भयानकच आहे. कोण केव्हा कोणत्या बाजुने येईल, कोण उलट येईल, नेम नसतोच. सगळी कडे हेच असे म्हणत असलो तरी इथली बेशिस्त जरा औरच आहे. तुम्ही कार पार्क केली की तुमच्या पुढे मागे कोणीही दुचाकी/ कार पार्क करु शकते, तुम्ही गाडी काढु शकत नाही बसा बोंबलत. डावी कडे वळताना जसे वळतो तसे लोक उजवी कडे वळताना पण शॉर्टकट मारुन (म्हणजे गाडी रस्ताच्या उजवीकडे घेउन) वळतात आणि त्यात त्यांना काहीच वावगे वाटत नाही. त्यामुळे निदान पहिल्या दिवशीतरी सेल्फ ड्रिव्हन घेऊ नका असे मी सुचवेन. पहिल्या दिवशी बघा ट्राफिक कशी वाटतेय, जमेल का आणि मग दुसर्‍या दिवसापासून घ्या.

mi_anu , Happy
माझी देशभर भ्रमंती असते, कामा निमित्त, बहुतेक सगळीकडच्या ट्राफिकचा अनुभव आहे.
पुण्यात सुद्धा अशी बेशिस्त परसतेय, पण इथे खरंच औरच आहे, प्रमाणही खुप जास्त आहे.

आशुतोष,
मस्तच. कुठली गाडी होती आणि साधारण किती वेळ लागला ड्राईवला? रस्ता नोट करुन ठेवते.

त्या झुमकार्स आणि माईल्स च्या कारवर १००किमी स्पीड लिमिट आहे ना? स्पीड क्रॉस केला तर फाईन आहे असे लिहीले आहे. त्याबद्दल काय अनुभव. सहसा छोट्या रस्त्यावर स्पीड कमीच असणार पण सिक्स लेन हायवे वगैरेला स्पीड थोडा जास्त होतो त्यावेळी सिग्न्ल मिळतोय का?
जिपीएस सिस्टीम गाडीत आहे का?
आणि झुम कार्स चा डेली ड्राईवचा काही कोटा आहे का? कारण जातायेताना २६० किमी आहे वनवे.

Delhi - Corbett around 6 hrs. drive. As ashutosh said road is good except some patches. driving above 100 is very difficult due to traffic. I also went 2/3 times but with my own car so no idea about rented car.

सावली,
३ वेळा ईनोव्हा आणि एकदा स्विफ्ट डिझायर ने गेलो होतो. सहा ते साडे सहा तास नक्कीच लागतील. किती वेळात दिल्ली-हापूर अंतर पार करतेस त्यावर वेळ अवलंबून आहे. एक तर बायपास नाही ह्या रस्त्यावर आणि अतिशय बेशिस्त ट्रॅफिक.

दिल्ली-हापूर-गजरौला-मोरादाबाद बायपास-काशीपूर-रामनगर असा रुट घे. रामनगर तुझं फायनल डेस्टिनशन आहे हे गृहित धरुन लिहितोय. शक्य झाल्यास ढिकाळा फॉरेस्ट रेस्ट हाउसचं बुकिंग मिळतय का ते बघ. पोचल्यावर लगेच एलिफंट राईड बुक कर. एलिफंट राईडचं बुकिंग आदल्या दिवशीच होतं. फॉरेस्ट डिपार्ट्मेंटचं रेस्ट हाउस आहे. सो ए.सी. वगैरे नाहीयत रुम्स. पण जेवण चांगलं आहे.

मला धाग्याचं नाव वाचून काहीच्या काही वाटलं! Google ची driverless car California च्या रस्त्यावर फिरत असते तशी सेल्फ ड्रीव्हन कार भारतात रेंटवर मिळते असं वाटलं पाहिल्यावर! हे कधी झालं असा विचार करत धागा उघडला मग पोस्ट्स वाचून उलगडा झाला!

We used zoom car for banglore- Mysoor and nagarhole tour in Dec. Its good. We have decided to use this service in future as well.

अजुनही तो तसच करायच्या मागे आहे. >>. जस्ट डू इट !

जयपूर पर्यंत जा आणि रहा. मग पुढचा दिवस जयपुर ते गंतव्य. (अगदी जयपुर खूप लांब वाटले तर अजमेरला राहा. पण ठाणे - दिल्ली रस्ता खूप चांगला आहे. एकदम जबरी NH8 मला चालवायला खूप आवडला. तुलाही आवडेल. ( मधला NE1 तर सुपर क्लास ! )

घर की गाडी पत्थरफोड है तो वोईच वापरो.

मायी लायनी चारचाकी मोटी व्हयल तवा एक्स्यूव्ही५ओओ नायतर क्रेटा हे पक्कं ठरवलंय. लाँग ट्रिप्स भयंकर आवडतात. ते सिटीत गाडी चालवणं तर आजकाल नक्को नक्को होऊन जातं

जिज्ञासा, मला सुद्धा तेच वाटले Lol तुमच्या ऑस्टीनला सुद्धा फिरत असतात ना त्या.

ड्रायव्हरसहीत गाडी बरी असेल ना भारतात. म्हणजे ड्रायव्हिंग ची दगदग नाही.

बरं या ज्या आपण ड्राइव्ह करण्यासाठी गाडया मिळतात त्या ऑटो असतात का? मला स्टिक शिफ्ट येत नाही म्हणून हा प्रश्न Proud

सावली रोड ट्रिप करायची तर करा पण इकडे पण मी अशी ट्रिप्स प्लान करते तेव्हा किती दिवस ड्राइव्ह करून दमायचं हा विचार करते. आणि ते जास्त दिवस मुख्य जागेसाठी ठेवते. अर्थात माझं हापिस सुट्ट्यांच्या बाबतीत फारच कंजूस आहे Wink अवांतरः या (आणि अजून एका) कारणास्तव आमचं यलोस्टोन राहिलंय Happy

>>मला धाग्याचं नाव वाचून काहीच्या काही वाटलं! Google ची driverless car California च्या रस्त्यावर फिरत असते तशी सेल्फ ड्रीव्हन कार भारतात रेंटवर मिळते असं वाटलं पाहिल्यावर!>> मलाही. सेल्फ ड्रिव्हन हे नाव मिसलिडींग आहे.

बरं या ज्या आपण ड्राइव्ह करण्यासाठी गाडया मिळतात त्या ऑटो असतात का? >>ऑटोमॅटिक पण मिळतात.. झूम वरती खूप मोठी रेंज अ‍ॅव्हेलेबल आहे. पाहिजेच असेल तर मर्कसुद्धा मिळते १७५ रू प्रतितासानं Wink

सावली, त्यांनी गाडी कोणती घेतली होते ते नाही लक्षात पण त्यांना बाकी काही प्रॉब्लेम आला नाही.. फक्त झूमकारचे कार कलेक्शन सेंटर एअरपोर्ट पासून लांब आहे असे ते म्हणत होते.. त्यामुळे त्यांची थोडी धावपळ झाली... अर्थात त्यात दिल्लीच्या ट्रॅफिकचाही तितकाच वाटा होता..

Pages