एका रातीची ओढ

Submitted by भास्कराचार्य on 17 February, 2016 - 21:08

चांदण्याची माझी ओढ जुनीच आहे
सुगंधाची माझी खोड जुनीच आहे
फुलावे प्रीतिलतेचे फूल अन् अनुरागाला बहर यावा
जावी रात तुझ्याबरोबर अन् पहाटेचा प्रहर यावा

निराकाराची माझी ओढ जुनीच आहे
तन्मयतेची माझी खोड जुनीच आहे
वाजावी निर्झर-बासरी अन् शृंगाराला कहर यावा
जावे रान थरारून अन् आनंद झुळझुळावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री, करतो कधीकधी. Happy

भुईकमळ, बरोबर आहे. तीच वाचून कधीतरी सुचली होती. Happy

धन्यवाद सगळ्यांना.