फुसके बार – १८ फेब्रुवारी २०१६ सहा मिनिटांमध्ये तीनदा, जेएनयुप्रकरणी निषेधार्ह मारहाण, योगेश्वरचे फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर

Submitted by Rajesh Kulkarni on 17 February, 2016 - 14:14

फुसके बार – १८ फेब्रुवारी २०१६ सहा मिनिटांमध्ये तीनदा, जेएनयुप्रकरणी निषेधार्ह मारहाण, योगेस्वरचे फुटीरतावाद्यांना प्रत्युत्तर
.

१) सहा मिनिटांमध्ये तीनदा

बोगद्यात फोनसाठीची रेंज न आल्याने त्याचे इंटरनेटचे कनेक्शन भंगले. तो बँकेचे ऑनलाईन ट्रांजॅक्शन करत असल्याने काही न करताही तुम्ही 'रिफ्रेश बटन दाबल्यामुळे किंवा एकच बटन दोन वेळा दाबल्याने एरर' असा मेसेज येऊन तो त्या वेबसाईट मधून बाहेर फेकला गेला.

आधीच बोगद्यात सिग्नल कसा येत नाही या विचाराने तो वैतागला होता. २०१६ सालातही इंडिया इतका मागासलेता कसा या भावनेने आपण वेळेतच योग्य तो निर्णय घेतल्याचे त्याला खूप समाधान वाटले.

पण त्याहीपेक्षा आपली काहीही चूक नसतानाही खोट्या आरोपावरून बॅंकेच्या वेबसाईटवरून बाहेर फेकले गेल्याचा अपमान त्याला जिव्हारी लागला. गांधीजींना प्रिटोरियात ट्रेनमधून बाहेर फेकले गेल्यावर काय वाटले असेल याची त्याला अनुभूती मिळाली. त्या निमित्ताने त्याला प्रथमच गांधीजींबद्दल आपुलकी वाटली.

पण या बोगद्याच्या समस्येबदल काही तरी करायला हवे असे त्याला मनापासून वाटले. बोगद्याऐवजी ट्रेन वळणे घेत डोंगर ओलांडू शकेल असा मार्ग तयार करण्याचा खर्च आणि बोगद्यातून जाताना इंटरनेट बंद झाल्यामुळे होणाऱ्या गैरसोयीची किंमत यांची तुलना करत, बोगद्याऐवजी डोंगराला वळसा घालणारा मार्ग तयार केला तर काही तासांमध्येच त्याचा पे बॅक म्हणजे ब्रेक इव्हन होईल याबद्दल त्याची खात्री पटली. एवढी साधी गोष्ट सरकारच्या लक्षात कशी येत नाही असे वाटून आपण अगदी वेळेत योग्य तो निर्णय घेतला याचे त्याला दोन मिनिटांत दुसऱ्यांदा समाधान वाटले. शिवाय एवढ्या मोठ्या समस्या असूनही आपल्या काही समविचारी मित्रांप्रमाणे आपण मात्र इंडियाला ब्लडी इंडिया म्हणत नाही याचे आंतरिक समाधान होतेच.

अडचण आली की गप्प बसणे त्याच्या स्वभावात नव्हतेच. आताच एका मिनिटात केलेले ब्रेक इव्हन अॅनॅलिसिस रेल्वेमंत्री प्रभूंपर्यंत पोहोचवायचा निश्चय त्याने केलाच होता व त्यातून सरकारने पीआयओंना रेल्वे मित्र हा पुरस्कार देण्याची सुरुवात केली तर तो हमखास आपल्यालाच मिळणार याची त्याला खात्री पटली.

शिवाय गरज ही शोधाची जननी असते यावरून इंग्लिशमध्येही अशीच एक सेईंग आहे हे त्याला आठवले व त्याने लगेच ही सेईंग अंमलात आणण्यासाठी मोबाईल चार्जिंगसाठी पॉवर बँक असते, तशी जेथे रेंज नसते तेथे वापरण्यासाठी इंटरनेट बँक का असू नये असा प्रश्न त्याच्या इन्नोव्हेशन सर्कलमध्ये विचारायचे ठरवले. एखाद्या कल्पनेचेही पेटंट घेता येते हे माहित असल्याने त्याने मायदेशीपरत गेल्या गेल्या एखाद्या आयपी अॅटर्नीला गाठायचे ठरवले. आपल्यालाच ही कल्पना आधी सुचली हे सिद्ध करावे लागले तर काय या कल्पनेने तो पुन्हा एकदा अस्वस्थ झाला व त्याने काही तासांचाही उशीर व्हायला नको म्हणून त्या कल्पनेची इमेल तयार करून स्वतःच्याच दुसऱ्या इ मेल आयडीवर पाठवती आणि मगच त्याने मान वर केली.

त्याचा शेजारचा माणूस चक्क खिडकीतून बाहेरच्या घाटातून दिसणारे सौंदर्य पहात होता. अशा पद्धतीने वेळ वाया घालवणाऱ्यांमुळेच इंडिया मागे आहे याची त्याची पुन्हा एकदा खात्री पटली आणि आपण अगदी वेळेत योग्य तो निर्णय घेतल्याची त्याची खात्री पटली. मागच्या सहा मिनिटांमध्ये तिसऱ्यांदा.

२) जेएनयुमधील विद्यार्थी कन्हैया कुमार याला कोर्टात सादर केले जात असताना त्याला काही वकिलांकडून मारहाण केली गेली. याचा धिक्कारच केला पाहिजे. दिल्ली पोलिस अजूनही कन्हैयाविरूद्ध सबळ पुरावे आहेत असे म्हणत असले, तरी ते पुरावे काय आहेत हे जोपर्यंत पुढे येत नाही, तोपर्यंत त्याला केवळ संशयितच समजले पाहिजे. आतापर्यंत पुढे आलेल्या पुराव्यांवरून हा नेता देशविरोधी घोषणा दिल्या जात होत्या तेथे उपस्थित होता, मात्र त्याचा प्रत्यक्ष घोषणा देण्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता असे दिसते. तरीही आज न्यायालयाने त्याला तब्बल पंधरा दिवसांची कोठडी का दिली हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

यापूर्वीही जेएनयुमधील विद्यार्थ्यांना, पत्रकारांना मारहाण केली गेली, पत्रकारांचे फोन हिसकावून घेतले गेले, त्यांना धमक्या दिल्या गेल्या, हे प्रकारही तसेच अगदी निषेधार्ह आहेत.

हे उद्योग करणारे इतर कोणी नसून स्वत: वकीलच आहेत हे तर आणखी धक्कादायक आहे. या वकिलांची वैयक्तिक मते काहीही असोत, पण ते जे करत आहे त्याला गुंडगिरीशिवाय दुसरे काही म्हणता येणार नाही. आज मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये मोबाइल फोनचोरीच्या संशयावरून दोन मुलांना अक्षरश: निर्वस्त्र करून काही प्रवाशांनी पट्ट्याने बेदम मारहाण करण्याचा भयंकर प्रकार झाला. वकिलांचे हे वागणेही असेच रानटीपणाचे आहे. दिल्लीत भाजपचे जे हातावर मोजण्याएवढे आमदार आहेत त्यांच्यातल्या एकाने एका डाव्या विचारसरणीच्या माणसाला बदडले व तो त्याच्या वागण्याचे निर्लज्जपणे समर्थन करत आहे.

या सर्व घडामोडींमध्ये जेएनयुमधील अभाविपच्या तीन पदाधिका-यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे आताच कळते आहे. त्यात त्यांनी ज्या पद्धतीने वकिलांकडून कन्हैया कुमारसह इतरांना मारहाण झाली, त्याचे कारण दिले आहे. शिवाय ब-याच काळापासून मनुस्मृतीवरून व रोहित वेमुला या दोन मुद्द्यांवरून असलेले मतभेद या कारणाचादेखील उल्लेख त्यात आहे.

कारणे काहीही असली तरी कोणतीही धडक कारवाई करण्यापूर्वी त्यासाठी सबळ कारणे आहेत का याची खात्री करून घेतली नाही, तरी लोक पुरेसे जागरूक आहेत. यातला दोन्ही बाजूंकडून केला जाणारा राजकारणाचा भाग सोडला तरी सर्वोच्च न्यायालयात याबद्दल मूलभूत प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पुरेशी कारणे नसतील तर न्यायालयाकडून कानउघाडणी झाल्यावर होणारी पंचाईत वेगळीच. त्यासाठी आणखी काळजी घ्यायला हवी.

३) योगेश्वर दत्तचे फुटीरतावाद्यांच्या घोषणांना प्रत्युत्तर

भारताचा आघाडीचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला जेएनयुमध्ये फुटीरतावाद्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. त्याने याबाबतीत एक कविताच सादर केली.

गज़नी का है तुम में खून भरा जो तुम अफज़ल का गुण गाते हो,
जिस देश में तुमने जनम लिया उसको दुश्मन बतलाते हो!
भाषा की कैसी आज़ादी जो तुम भारत माँ का अपमान करो,
अभिव्यक्ति का ये कैसा रूप जो तुम देश की इज़्ज़त नीलाम करो!
अफज़ल को अगर शहीद कहते हो तो हनुमनथप्पा क्या कहलायेगा,
कोई इनके रहनुमाओं का मज़हब मुझको बतलायेगा!
अपनी माँ से जंग करके ये कैसी सत्ता पाओगे,
जिस देश के तुम गुण गाते हो, वहाँ बस काफिर कहलाओगे!
हम तो अफज़ल मारेंगे तुम अफज़ल फिर से पैदा कर लेना,
तुम जैसे नपुंसको पे भारी पड़ेगी ये भारत सेना!
तुम ललकारो और हम न आये ऐसे बुरे हालात नहीं
भारत को बर्बाद करो इतनी भी तुम्हारी औकात नहीं!
कलम पकड़ने वाले हाथों को बंदूक उठाना ना पड़ जाए,
अफज़ल के लिए लड़ने वाले कहीं हमारे हाथों न मर जाये!
भगत सिंह और आज़ाद की इस देश में कमी नहीं,
बस इक इंक़लाब होना चाहिए,
इस देश को बर्बाद करने वाली हर आवाज दबनी चाहिए!

तो शेवटी म्हणतो,

ये देश तुम्हारा है ये देश हमारा है, हम सब इसका सम्मान करें,
जिस मिट्टी पे हैं जनम लिया उसपे हम अभिमान करें! जय हिंद।

४) समज – गैरसमज

होस्टेलवर असताना पुण्याच्या मित्राने हापूसचे आंबे आणले. त्यातले बहुतेक आंबे थोडेफार लागलेले होते. त्याने ते जेव्हा मित्रांबरोबर शेअर केले, तेव्हा अर्थातच त्याच्या लक्षात आले नाही. पण त्याला जेव्हा हा प्रकार कळला तेव्हा त्याने आंबा खाण्याचे थांबवले. त्याने एवढ्य हौसेने आणले होते, थोडेच तर लागले होते, तेव्हा त्याला कोठे नाराज करा असे वाटून आम्ही मात्र खात राहिलो.

पण हे कुठल्या दुष्काळातून आलेत, आंबे खराब आहेत तरी खात आहेत, असा त्याचा समज झाला असेल का? त्या नजरेने तो आमच्याकडे पहात राहिला असेल काय?

अशा प्रकारे अगदी सहजपणे सासू-सुनांमध्ये गैरसमज निर्माण करू शकणारे प्रसंगही सांगितले जातात. उदाहरणार्थ रात्रीच्या जेवणानंतर स्वयंपाकघर आवरून झाल्यावर निजानीज झाल्यावर सुनेला स्वयंपाकघरात दररोज कसला तरी आवाज ऐकू येई. तिच्या लक्षात आले की तिच्या सासूबाई तेथे जातात. हे रोजच झाल्यावर तिला वाटू लागते की तिने सारे काही नीट आवरून ठेवले आहे की नाही याची नंतर पाहणी करण्यासाठीच सासूबाई मुद्दाम सगळे झोपी गेल्यावर तेथे जाऊन पाहतात. अर्थात सासूबाई त्यांची कवळी काढून ठेवण्यासाठी तशी चक्कर मारत असतात. कारण नव्या सुनेसमोर तसे करणे त्यांना प्रशस्त वाटत नसते.

कधीकधी नको तेवढा भिडस्थपणा तर कधी दुसरे स्पष्टवक्तेपणाचे किंवा फटकळपणाचे टोक. एकामध्ये न बोलल्यामुळे गैरसमज निर्माण होणार आणि नको तेवढे वाढणार. दुस-यामध्ये किरकोळ गोष्टींमधूनही नाते तुटायचीच शक्यता.

मध्यममार्ग हाच उत्तममार्ग हे त्यांना कोण सांगणार!

५) खाली फोटो असलेले 'दि स्वदेशी मालाचा व्यापार करणारी कंपनी लि.' या नावाचे १८७३मध्ये स्थापना झालेले कपड्यांचे दुकान कोठे आहे हे कोण सांगू शकेल? अर्थात स्त्रीवर्गालाच याचे उत्तर माहित असण्याची शक्यता अधिक वाटते.
20160217101256.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Shop No-227, Sheikh Memon St, Lohar Chawl, Kalbadevi, Mumbai, Maharashtra 400002

घ्या कुलकर्णी शोधल की सापडत।

येस! लोहार चाळ भागात स्वदेशीची दुकानं आहेत. गिरगावात राहात असताना खूप पुर्वी आईबरोबर गेले होते तिथल्या एका स्वदेशीच्या दुकानात.

http://www.loksatta.com/aghralekh-news/anti-national-slogans-are-not-sed...

काय चाललय काय्?:अओ: तो कन्हैयाकुमार दोषी आहे तर त्याला कायद्यावर सोपवा. ही हाणामारी कशाला? आणी वकिलच असला आचरटपणा करायला लागले तर त्यान्च्या अशिलानी काय करायचे? की कोर्टात दाखल झालेल्या केस हाणामार्‍या करुनच सोडवाव्यात?

निन्दकाचे घर असावे शेजारी ही म्हण एकदम बरोबर आहे. मोदीनी आताच पावले उचलली नाहीत ( देशाबाहेर जाण्यासाठी नाही) तर प्रत्येक क्षेत्रात पाचकळपणा, अरेरावी, गुन्ड-पुन्डशाही वाढत जाईल. महाराष्ट्रात काका-पुतण्यानी, कोकणात राणेनी ती सभ्य रीत्या जोपासली, इकडे खुलेआम चालू आहे.

हम नही सुधरेन्गे.

रश्मी,

तुमच्यातील निरागसपणाला, भोळेपणाला मुजरा करतो. अहो किती भाबडेपणा कराल?

ह्यातील एक तरी गोष्ट तुम्हाला उत्स्फुर्त वाटते का? ह्यातील प्रत्येक गोष्ट चिथावणीतूनच होत आहे. मग ते उजवे असोत, मधले असोत, डावे असोत नाहीतर देशप्रेमी असोत नाहीतर देशद्रोही!

तुम्ही हे असे काहीतरी लिहिता आणि मग उपरोध हे एकमेव अस्त्र हाताशी उरलेले अवतरतात आणि पांडित्य दाखवतात. हे मागेही लिहिलेले होते.

अहो तेच काय, मुळत काहीच पटत नाही. आज जे काही इश्यूज होत आहेत ते पूर्वी झालेले आहेत. फक्त इश्यूजना जोरदार हवा देण्यापुरतेच नावीन्य आहे ह्या सगळ्यात! ते पेटवतात, आपण पेटून उठतो आणि कळफलक बडवतो. की झाले. तिकडे काही जण दुसर्‍यांची टाळकी फोडतात. की झाले.

ओ मोदी मुदित मंदबुद्धि मित्रों
ओ भाषण-भुक्त भ्रष्टबुद्धि भक्तों
ओ लुटियन-चारण चिंतक औ
‘मॉडल’ पर लट्टू परबुध आसक्तों
नये साल पर मैं घर-घर अपनी दिनदर्शिका* भिजवाऊंगा
करना मुझको माफ़ मैं अच्छे दिन नहीं ला पाऊंगा।

सौ क्या दो सौ दिन बीत गये
वादे काले धन के अतीत भये
अगली बार भी उसी पुराने भाषण को दोहराऊंगा
करना मुझको माफ़ मैं करिया धन नहीं ला पाउँगा।

किसान ख़ुदकुशी रोज कर रहे
बलात्कार भी रोज बढ़ रहे
देश की चिंता जब भी होगी मैं विदेश घूम आऊंगा
करना मुझको माफ़ मैं बस यूँ ही धूम मचाउंगा

दिन-ब-दिन रुपया गिरा जा रहा
छूने अडवाणी की उम्र आ रहा
मेरे हाथ में जो है जैसे ‘फेक इन इंडिया’ चलाऊंगा
करना मुझको माफ़ मैं गिरता रुपया नहीं उठाऊंगा।

पुर्ण कविता-

http://teekhimirchi.in/2014/12/karna-mujhko-maaf-ae-bhakton/