ही दिशाहीनता बरी आहे

Submitted by जयदीप. on 15 February, 2016 - 11:32

सर्व काही अधांतरी आहे
जन्मली शक्यता जरी आहे

चारचाैघात ओळखू येतो
फार विक्षिप्त शायरी आहे

सांग, विश्वास का बसत नाही?
बातमी ही किती खरी आहे

फार बहुधा जगायची नाही
एक इच्छा तुझ्या घरी आहे

नेत आहे मला नव्या जागी
ही दिशाहीनता बरी आहे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users