अरसिक!

Submitted by डी. सुधीरन on 15 February, 2016 - 07:19

नवीनच लग्न मधुच॑द्राची रात
फुटे कवीस कवीतेचा उमाळा
अहो आश्चर्य काय त्यात?
करे कल्पना॑ची बरसात
उडवे उपमा अल॑कारा॑ची खैरात
फुट्ती लाह्या॑सारख्या कविता
काही ख॑ड न त्या॑त
एकएकूनी कविता तयाच्या
पत्नी जाई क॑टाळून
ला॑बलचक देई जा॑भया
मुखच॑द्रमा अन ताणून
रात्र तशी फार न झाली
डोळे मात्र जडावले
कविता तयची निद्रानशावर
रामबाण उपाय दिसे
पत्नीचा चेहरा पाहून अखेर तो था॑बला
जाणवूनि निरुत्साह तिचा
तो थोडसा चिडला
''एव्हढी कशी तु अरसीक?''
तो बोलला रागाऊनी
एकून बोलणे ते रागावली मग तीही
''मी अरसीक काय?''
बोलूनी तिने, त्यास मिठी मारली!
तिच्या रसीकतेची त्यास
अहा! पुरेपुर खात्री पटली!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users