माणसाला माणसाची गरज च नाहि.....

Submitted by dipak.vichare on 15 February, 2016 - 04:34

काल सुट्टी होती म्हणून जर उशीराच उठलो तर कळाल कि शेजारच्या आपटे काकांना दवाखान्यात नेलंय. मग तयार होऊन दवाखान्यात गेलो काकू होत्या बसलेलेया काकांचा डोळा नुकताच लागलेला, चौकशी केल्यावर काकू सांगू लागल्या. . . . . . . . . . " रात्री अचानक छातीत दुखायला लागल मग भरती केल".
मी म्हटलं काकू मला उठावयाच ना मी आलो असतो, तुम्ही एकट्या काय केल असत (मला माहित होत कि त्यांचा मुलगा आणि सून वेगळे राहतात). . . . . .
अरे मला काहीच नाही कराव लागल फक्त हॉस्पिटल ला फोन केला त्यांची रुग्णवाहिका आली त्यांनीच सगळ केल पुढच आमच मेडीक्लेम आहे पैसे पण नाही
भरावे लागले सगळ व्यवस्तीत झाल कुणाची गरजच काय. . . . . . . . . . खर आहे मी म्हटलं… थोडा वेळ बसलो आणि बोलायची पद्धत म्हणून बोललो काही लागल तर सांगा ????? आणि निघालो चालता ना डोक्यात चक्र फिरायला लागल कि खर आहे काकुनचं कुणाला कुणाची गरज च काय राहिले आहे आजकाल
एका फोन वर सगळी काम होतायेत, कुणी आल फोन करा हव ते मागवा……. कुणी गेल तरी…….……. ?? फोन करा आणि हव तेच मागवा……. साध्या साध्या गोष्टीच घ्याना कुठे जायचं असेल तर कुणाला तरी आटो, टेक्सी बगायला सांगाव लागायचं पण आता एक फ़ोन करा दाराशी येते…। व्हाट्स अप्स, फेस बुक वर रोज भेट होते कुणाकडे जायची गरज नाही, शेजारी जाऊन गप्पा मारण्या पेक्षा ऑन लाईन गप्पा मारता येतात कि. दुकानांत जाण्याची गरज नाही ऑन ईन मागवा सगळ घरी येत… जर डोळे उघडून बगितल तर कळेल कि माणसाला माणसाची गरज च राहिली नाही आहे. कुणाच कुणाशिवाय अडत नाही. एकुलता एक मुलगा नवरा बायको बस तीघेच त्याला एकत्र कुटुंब म्हणजे काय तेच माहित नाही मग शेजार कस कळणार. मित्र तर दरवर्षी नवीन आणि जुने फेस बुक वर फक्त लाईक मारण्यासाठी… फ्रेंडशिप डे ला हातावर नाव लिहिल कि झाल मग त्यांना हृदयावर नाव कोरणारा मित्र कसा कळणार ????
सगळच ऑन लाईन होऊ पाहताय कुणाला कुणासाठी थांबण्याची गरज नाही राहिली,,, "माजी गाडी घेऊन मी जाणार मला दुसर्यांची गरज काय"???
साधे फंडे झालेत सगळे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे फार खरं नाही.'माणसाची गरज नाही' म्हणणार्‍यांच्या आयुष्यात छोट्या छोट्या वाईट घटनांनी पण डिप्रेशन येते.
अयोग्य कंपनीपेक्षा एकटेपणा 'एंजॉय' होतो हे खरे, पण एकटेपणाच जर आयुष्यभर मिळाला तर अगदी रस्त्यातून जाणार्‍या कचरेवाल्याने का होईना, आपल्याशी चार शब्द बोलावे असे नक्की वाटेल.

अहो, असं कसं म्हणता?
काकांबरोबर काकू होतरोबर्म्हणून फोन तरी करू शकल्या.
एकटेच काका आजारी पडले/बेशुद्ध झाले तर फोन कोण करणार?
दुसर्‍या दिवशी कामवाले/वॉचमन्/चुकून एखादा शेजारी दार ठोठावेपर्यंत कळणार नाही.
मेडीक्लेमचे पण पेपर्स /कार्ड नं वगैरे बरोबर घेऊन जायला कुणी बरोबर नको का?

अजूनतरी माणसाला माणसाची गरज आहे.

अनुजी आणि साती जी तुमच्या प्रतिसाद बद्दल प्रथम धन्यवाद… माज अस प्रांजल मत आहे कि आपल्या बद्दल्नाऱ्या जीवनपद्धती मुळे माणूस माणसा पासून लांब जात आहे आणि जर आपण प्रक्टिकल विचार केला तर नवरा बायको हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत थोडक्यात ते एकाच आहेत पण त्या व्यतिरिक्त आपल्या आजू बाजूला असणाऱ्या इतर लोकांबद्दल विचार केल्यास तुम्हाल माझ म्हणन बहुतेक पटेल….