परिक्षा

Submitted by धनुर्धर on 14 February, 2016 - 07:18

छळणार्या प्रश्नांना उत्तराची शिक्षा द्यावी
कधीतरी आपण आपलीच परिक्षा घ्यावी

कधीतरी भराव्यात आयुष्यातल्या गाळलेल्या जागा
विस्कटलेल्या जोड्या जुळवाव्यात मारून रेघा

कोण कोणास काही म्हणो आपण का मनावर घ्यावे
आपल्याच एखाद्या वाक्याचे संदर्भासह स्पष्टीकरण द्यावे

आपल्यावरच एखाचा निबंध लिहता येतो का पहावा
किंवा पत्राचा मायना आपल्यासाठी लिहावा

डोळ्याखालून घालावे एकदा कवितेचे काय असते व्याकरण
म्हणी, समास, छंद, अलंकार
समजून घ्यावे एखादे प्रकरण

चूक , बरोबर काय ते पाहून
आपल्यालाच द्यावेत गुणा
आपलाच पेपर आपण पहावा एकदा तपासून

. . . . . धनंजय . . . . .

Group content visibility: 
Public - accessible to all site users